ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

शिवनेरी बस मध्ये दिसणार शिवनेरी सुंदरी


मुंबई – राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसची प्रवासी संख्या वाढावी यासाठी एसटी महामंडळाकडून नवे नवे राबवले जात आहेत.त्याचाच एक भाग म्हणून विमानात प्रवाशांच्या सेवेसाठी ज्या प्रमाणे हवाई सुंदरी असतात त्याच धर्तीवर आता शिवनेरी बस मध्ये शिवनेरी सुंदरी ठेवल्या जाणार आहेत .
मुंबई -पुणे मार्गावर धावणाऱ्या एसटीच्या ई-शिवनेरी बसमध्ये प्रवाशांना मदत करण्यासाठी हवाई सेवेच्या धर्तीवर आदरातिथ्य व्यवस्थापनाची सेवा देणारी परिचारिका ‘शिवनेरी सुंदरी’ नेमण्यात येणार आहे. या माध्यमातून प्रवाशांच्या तिकिटावर कोणताही अधिभार न लावता प्रवाशांना चांगल्या सेवा सुविधा देऊन गुणात्मक सेवेचा दर्जा उंचावेल अशी अभिनव योजना भविष्यात सुरू करण्यात येणार आहे असे प्रतिपादन एस.टी. महामंडळाचे अध्यक्ष भरत गोगावले यांनी महामंडळाच्या 304 व्या बैठकीमध्ये केले.
एसटी महामंडळाचे नवे अध्यक्ष भरत गोगावले यांच्या अध्यक्षतेखाली संचालक मंडळाची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये विविध खात्याच्या तब्बल 70 पेक्षा जास्त विषयांवर चर्चा होऊन त्यांना मान्यता देण्यात आली. त्यापैकी, मुंबई-पुणे मार्गावर धावणाऱ्या ई-शिवनेरी बसमध्ये प्रवाशांना मदत करण्यासाठी परिचारिका नेमण्यास मान्यता देण्यात आली.

error: Content is protected !!