खासदाराने मराठी भाषेला दिला मान सन्मान..
माजी खासदार जनसेवक गोपाळ शेट्टी यांचा बोरीवली येथे भव्य नागरी सत्कार…
घट स्थापनेच्या शुभ मुहूर्तावर केद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देत असल्याची घोषणा केली. तमाम मराठी जनांच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला.
उत्तर मुंबई तून दोनदा महाराष्ट्रात प्रथम येऊन प्रचंड मतांनी निवडून खासदार पदी निवडून आलेल्या गोपाळ चिनय्या शेट्टी या अमराठी खासदाराने निवडून आल्यानंतर सन २०१४ पासून सातत्याने संसदेत व संसदेच्या बाहेर मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालाच पाहिजे ही मागणी सातत्याने लावून धरली एवढेच नव्हे तर त्याचा पाठपुरावा केला. आज मराठी अस्मितेसाठी कटिबद्ध असणारे व मराठी भाषेला अभिजात दर्जा प्राप्त झाल्या बद्दल माजी खासदार जनसेवक गोपाळ शेट्टी यांचा बोरीवली येथे भव्य नागरी सत्कार समारंभ आयोजीत केला गेला.
उत्तर मुंबई मध्ये अन्य भाषिक मतदारां बरोबरच मराठी भाषिक जनतेने माझ्यावर अलोट प्रेम केले व मला भरभरून मतदान केले त्या मराठी भाषिक जनतेचे ऋण मी यामुळे थोड्याफार प्रमाणात फेडू शकलो याचा मला आनंद आहे व मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी मी एक खारीचा वाटा उचलला यासाठी अनेकांनी प्रयत्न केले यात भाजपा राष्ट्रीय सरचिटणीस विनोदजी तावडे यांचेही योगदान असल्याचे तसेच अनेक मराठी वृत्तपत्रांचा देखील मोठा वाटा असल्याचे प्रतिपादन शेट्टी यांनी या प्रसंगी बोलताना व्यक्त केले. भारताचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी व त्यांच्या मंत्रीमंडळाचे आभार व्यक्त केले. मराठी भाषेने देशासाठी केलेल्या सांस्कृतिक योगदानाचा हा गौरव असल्याचे प्रतिपादन सत्कार प्रसंगी बोलताना शेट्टी यांनी व्यक्त केले. मी जनसेवक ह्या नात्याने यापुढेही गोर-गरीब जनतेची सेवा करत राहणार असल्याचे याप्रसंगी बोलताना सागितले.
इतिहासकार व इतिहासाचे गाढे अभ्यासक रविराज पराडकर यांनी देखील एका कर्नाटकी खासदाराने मराठी साठी दिलेले योगदान मोठे असल्याचे प्रतिपादन या प्रसंगी बोलताना व्यक्त केले. मराठी वर प्रेम करणारी जनता, कार्यकर्ते व विविध स्तरातील अनेक मान्यवर मोठया प्रमाणात या सत्कार प्रसंगी उपस्थित होते.