ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

चेंबूर मध्ये पेटत्या दिव्याने घेतला एकाच कुटुंबातील सात जणांचा बळी


मुंबई/चेंबूरच्या सिद्धार्थ नगरात पहाटे आग लागून एकाच कुटुंबातील सात जणांचा मृत्यू झाला .मृतांमध्ये दोन लहान मुलांचाही समावेश आहे याप्रकरणी पोलीस सध्या चौकशी करीत आहे दरम्यान मृतांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आर्थिक मदत जाहीर केली आहे
चेंबूरच्या सिद्धार्थ कॉलनीच्या के एन गायकवाड मार्गावरील गांगुर्डे फ्लॅट नंबर 16 येथे चेधीराम अलगुराम गुप्ता यांच्या राहत्या घराला पहाटे आग लागली त्यांचे घर वन प्लस पोट माळ्याच्या असून घराला तळमजल्यावर किराणा मालाचे दुकान होते या दुकानांमध्ये रॉकेलचे कॅन ठेवण्यात आले होते महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार घराच्या इतर बॉक्समध्ये शॉक सर्किट होऊन ही आग लागली आणि रॉकेल मुळे ती सर्वत्र पसरली आणि संपूर्ण घर आणि घरातील सातही माणसं जळून गेली मृतांमध्ये गीता देवीचे छेदीराम गुप्ता, अनिता धर्मदेव गुप्ता, विधी धरमदेव गुप्ता, नरेंद्र धर्मदेव गुप्ता प्रेम छिराम गुप्ता मंजू प्रेम गुप्ता आदींचा समावेश आहे हे सर्वजण पोट माळ्यावर झोपले होते .मात्र मात्र दुकानात पेटता दिवा होता त्यातच शॉर्ट सर्किट झाले आणि आज लागली रॉकेलच्या बरेलमुळे आग भडकली व पोट माळ्यावर झोपलेले सर्व वरती अडकून त्यांचा आगीत होरपळून मृत्यू झाला

error: Content is protected !!