ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

हरियाणा मध्ये भाजपची हॅट्रिक व जम्मू-काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्स काँग्रेस आघाडीला यश


चंदीगड/हरियाणा आणि जम्मू-काश्मीर मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीचा आज निकाल लागला. हरियाणामध्ये ९० पैकी ४८ जागा जिंकून भाजपाने निर्विवाद बहुमत मिळवले आहे .त्यामुळे भाजपाने हरियाणात तिसऱ्यांदा सत्ता स्थापन करणार आहे. पण जम्मू-काश्मीरमधे नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस आघाडीने भाजपला बॅक फुटवर ढकलले. त्या ठिकाणी नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस आघाडीला निर्विवाद बहुमत मिळाले आहे. नॅशनल कॉन्फरन्स ला ४३ तर काँग्रेसला ६ जागा मिळाल्या. भाजपला या ठिकाणी 29 जागा मिळाल्या परंतु मेहबूबा मुक्तीच्या पीडीपीचा मात्र सुपडा साफ झाला. त्यांना केवळ तीन जागा मिळाल्या. मेहबूबा मुक्तीची मुलगी या निवडणुकीत पराभूत झाली.
हरियाणा मध्ये एक ऑक्टोबरला विधानसभेच्या ९० जागांसाठी निवडणूक झाली होती. मात्र सर्व एक्झिट पोल वाले काँग्रेसलाच फेवर करीत होते .काँग्रेसची सत्ता येणार असे सांगत होते. पण आज मतमोजणीच्या दिवशी एक्झिट पोल वाल्यांचे सर्व दावे फोल् ठरले त्या ठिकाणी भाजपने ४८ जागां जिंकून निर्विवाद बहुमत मिळवले. लाडवा मतदार संघातून मुख्यमंत्री नायाबसिंग सैनी १६ हजाराहून अधिक मतांनी विजयी झाले. तर भाजपाच्या विरोधात मोठे आंदोलन करणारी कुस्तीपटू आणि काँग्रेसची उमेदवार विनेश फोगाट जुलाना मतदारसंघातून निवडून आली. काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री भूपेंद्र सिंग हुड्डा हे सुद्धा निवडून आले. परंतु भाजपला हरवण्यात काँग्रेसला अपयश आले. काँग्रेसला ३७ जागा मिळाल्या. तर जेजेपी आणि इतर पक्षांचा सुपडा साफ झाला. आम आदमी पक्षाला एकही जागा मिळाली नाही. त्यामुळे आता हरियाणामध्ये भाजपाचे तिसऱ्यांदा सरकार स्थापन होणार आहे. दरम्यान जम्मू-काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्स ची सत्ता येणार आहे. आणि उमर अब्दुल्ला मुख्यमंत्री होण्याची शक्यता आहे. या ठिकाणी जम्मू मध्ये भाजपला यश मिळाले. तर काश्मीरमध्ये मुस्लिम समाजाची एक गटा मतदान करून फारूक अब्दुल्लांच्या नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस आघाडीला निवडून दिले. त्यामुळे तिथे नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस आघाडीचे सरकार येणार आहे.

error: Content is protected !!