ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

यूपीतील बेहराईच मध्ये देवीच्या विसर्जन मिरवणुकीवर दगडफेक – एक ठार दगडफेकीनंतर दोन गटात राडा संचारबंदी जारी


बेह्राईच/उत्तर प्रदेशातील बहराईच मध्ये देवीच्या विसर्जन मिरवणुकीवर झालेल्या दगडफेकीत गोपाळ नावाच्या एका तरुणाचा मृत्यू झाला त्यानंतर संतप्त झालेला जमाव रस्त्यावर उतरला आणि घोषणाबाजी व दगडफेक सुरू झाली या घटनेनंतर विरोधी जमाव ही रस्त्यावर उतरला आणि दोन गटात प्रचंड राडा सुरू झाला यावेळी पोलिसांना सुरुवातीला लाठीमार आणि नंतर गोळीबार करावा लागला या गोळीबारात एका तरुणांचा मृत्यू झाला तर पाच जण जखमी झाले आहेत सध्या बेहराईजमध्ये सज्जारबंदी जारी करण्यात आली असून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दंगलखोरांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत त्याचबरोबर देवीच्या मिरवणुकीवर दगडफेक करणाऱ्यांना सोडणार नाही अशा प्रकारच्या घटना भविष्यात होणार नाही याची सरकार पूर्ण काळजी घेईल आणि दंगल खोरांवर आवश्यक ती कारवाई करेल असे योगिनी सांगितले दरम्यान या घटनेचे तीव्र पडसाद इतर भागात उमटू नयेत यासाठी पोलिसांना पूर्णपणे अलर्ट करण्यात आले आहे

error: Content is protected !!