ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

निवडणूक आयोगाच्या आदेशा नंतर लाडकी बहीण योजनेला स्थगिती


मुंबई/महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक तिच्या कार्यक्रम जाहीर झाला आहे. 20 तारखेला मतदान आणि 23 तारखेला निकाल आहे. ज्या दिवशी निवडणूक आयोगाने निवडणुकीची घोषणा केली त्या दिवसापासून राज्यात आचारसंहिता लागू झालेली आहे. याच आचारसंहितेच्या कारणावरून निवडणूक आयोगाने राज्यातील सर्व प्रशासकीय विभागांसाठी एक महत्त्वाचा आदेश काढला आहे. त्यानुसार मतदारांवर प्रभाव टाकणाऱ्या सर्व योजनांना स्थगिती देण्याचे आदेश दिले आहेत. त्यामध्ये महायुती सरकारची महत्वकांक्षी योजना, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेचाही समावेश आहे. त्यामुळे आता नोव्हेंबर महिन्यात लाडके बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना पैसे मिळणार नाही. दरम्यान महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी ट्विट करून महिलांना दिलासा आहे त्यांनी म्हटले आहे .लाडकी बहीण योजना बंद झालेली नाही. केवळ आचारसंहितेमुळे तिला स्थगिती देण्यात आली आहे. पण निवडणूक आचारसंहिता संपली की या योजनेअंतर्गत डिसेंबर महिन्याचे पैसे सर्व लाभार्थी महिलांना दिले जातील अशी माहिती आदिती तटकरे यांनी दिली आहे.

error: Content is protected !!