ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

काँग्रेसची ४८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर


मुंबई/गेल्या अनेक दिवसांपासून महाविकास आघाडीत जागा वाटपाचा जोक होळ सुरू होता तो अजूनही पूर्णपणे मिटलेल्या नाही महाविकास आघाडी 270 जागांवर एकमत झाल्याचे सांगण्यात येते परंतु प्रत्यक्षात अजूनही पंधरा ते वीस जाग्यांवर मध्ये आहे या मतभेदातच शिवसेनेने ६५ 65 उमेदवार यांची पहिली यादी जाहीर केली होती त्यानंतर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने 45 उमेदवारांची आपली पहिली यादी जाहीर केली आणि त्यानंतर आज संध्याकाळी काँग्रेसने आपल्या अत्तेचाळीस उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे
काँग्रेसच्या पहिल्या यादीत प्रदेशाध्यक्ष नाना पटवले बाळासाहेब थोरात विजय वडेट्टीवर नितीन राऊत पृथ्वीराज चव्हाण विश्वजीत कदम आदी प्रमुख नेत्यांचा समावेश आहे विशेष म्हणजे धारावीच्या आमदार वर्षा गायकवाड या लोकसभेवर निवडून गेल्यामुळे त्यांच्या रिकाम्या झालेल्या धारावी विधानसभेच्या जागेवर त्यांनी आपली बहीण डॉक्टर ज्योती गायकवाड हिला तिकीट मिळवून दिले आहे तर चांदीवली मागच्या वेळेला पराभूत झालेले नसीम खान यांना तिकीट मिळाले आहे मालवणी त असलम शेख काँग्रेसचे उमेदवार आहेत तर मुंबादेवीत अमित पटेल यांना पुन्हा तिकीट देण्यात आले आहे इतर उमेदवारांमध्ये काँग्रेसचे मागील सर्व आमदार आहे पण भाजपमधून आलेल्या दोघांना काँग्रेसने तिकीट दिले आहे त्यामुळे काँग्रेसची स्थिती ही शरद पवारांच्या राष्ट्रवादी सारखी झालेली आहे काँग्रेसचे उर्वरित उमेदवार उद्या जाहीर केले जाणार आहे

error: Content is protected !!