वरळीतून मिलिंद देवरा तर दिंडोशी मधून संजय निरुपमना उमेदवारी
मुंबई – विधानसभा निवडणुकीसाठी शिंदेंच्या शिवसेनेने आज २० उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. या यादीत कुडाळ मधून निलेश राणे ,वरलीतून मिलिंद देवरा तर दिंडोशी मधून संजय निरुपम यांना उमेदवारी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे सध्या विधान परिषदेच्या आमदार असलेल्या भावना गवळी यांना विधानसभेच्या निवडणुकीत उतरवण्यात आले असून त्यांना रिसोड मधून उमेदवारी देण्यात आली आहे.
शिंदेंच्या शिवसेनेने यापूर्वी ४५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती . त्यानंतर आज २० उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली वरळी मधून मिलिंद देवरा यांना उमेदवारी देण्यात आल्याने तिथे आता आदित्य ठाकरे , मनसेचे संदीप देशपांडे आणि मिलिंद देवरा अशी तिरंगी लढत बघायला मिळेल शिंदेंच्या दुसऱ्या यादीत यादीत ,निलेश राणे -कुडाळ, मिलिंद देवरा- वरळी ,विलास तरे – बोईसर , संतोष शेट्टी भिवंडी पूर्व, मुरजी पटेल – अंधेरी पूर्व, तुकाराम काते -चेंबूर, सुवर्ण कारंजे -विक्रोळी, राजेंद्र गावीत – पालघर, अमिषा पाडवी – अक्कलकुवा, शांताराम मोरे – भिवंडी ग्रामीण ,भावना गवळी – रिसोड , बाबुराव कदम -हदगाव, विश्वनाथ भोईर – कल्याण प. , शंकर पाटील -नांदेड दक्षिण, आनंद भरोसे – परभणी , राजेश शिरसागर- कोल्हापूर उ, बालाजी किणीकर – अंबरनाथ , बळीराम शिर्शिर्सागर – बाळापुर , यांचा समावेश आहे .