स्टॅमिना वाढवण्यासाठी शक्तीवर्धक वायाग्रा खाणाऱ्या इसमाचा मृत्यू
मुंबई/गुजरात मधून एका मुलीला मुंबईला तिला एका हॉटेलमध्ये नेऊन तिच्याशी शरीर संबंध करण्यासाठी स्टॅमिना वाढावा म्हणून शक्तीवर्धक व्याघ्र गोळ्या खाणाऱ्या एका डायमंड व्यापाऱ्याचा हार्ट अटॅक ने मृत्यू झाला आहे
गुजरात मधील संजय कुमार तिवारी हा एका डायमंड कंपनीत व्यवस्थापक म्हणून काम करतो त्याने तिथल्याच एका कुटुंबाला आर्थिक मदत केली होती त्यानंतर त्या कुटुंबातील चौदा वर्षाच्या मुलीला घेऊन तो मुंबईला आला त्या मुलीबरोबर त्याने ग्रँड रोडच्या एका हॉटेलमध्ये वास्तव्य करण्याचे ठरवले इथे त्याने स्वतःच्या सतरा वर्षाच्या मुलीच्या आधार कार्डवर त्या मुलीला प्रवेश मिळवून दिला आणि त्या रात्री तिच्याशी शरीर संबंध केले हे शरीर संबंध जास्त वेळ टिकावे म्हणून त्याने शक्तीवर्धक व्याग्रा गोळी खाल्ली होती शरीर संबंध झाल्यानंतर त्याला अस्वस्थ वाटायला लागले आणि तो बेशद्ध पडला त्यानंतर त्या मुलीने याबाबतची माहिती हॉटेल कर्मचाऱ्याला दिली हॉटेल कर्मचाऱ्यांनी त्याला जे जे रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले परंतु तिथेच त्याचा मृत्यू झाला या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून चौकशीत याबाबतची सगळी माहिती उघडकीस आली आहे .पोलिसांनी या प्रकरणी मयत तिवारी याच्यावर मुलीच्या आईच्या फिर्यादी च्या आधारे पोस्को ॲक्ट म्हणजेच अल्पवयीन मुलीशी संभोग करणे या कलमाखाली गुन्हा नोंदवला असून या प्रकरणी पोलीस अधिक चौकशी करीत आहेत.