ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

उद्धव ठाकरेंच्या बेगेत काय असणार ? ठाकरे बंधूंचा पुन्हा कलगी तुरा सुरु


मुंबई – उद्धव ठाकरेंची निवडणूक अधिकार्यांनी बेग तपासल्या वरून मोठा कल्लोळ उठला आहे. माझ्या प्रमाणेच मोदी आणि शहांची बेग तपासणार का असा उद्धव ठाकरेंनी अधिकार्यांना सवाल केला त्यावर बोलताना राज ठाकरे म्हणाले ज्या माणसाच्या हातून पैसा सुटत नाही त्याच्या बेगेत काय असणार असा सवाल केला

  राज्यात  विधानसभा निवडणुकीचा प्रचार जोर धरू लागला आहे. ठिकठिकाणी राजकीय नेत्यांच्या प्रचारसभा आयोजित केल्या जात आहेत. अशातच या प्रचारसभेला जात असताना सलग दोन दिवस उद्धव ठाकरे यांची बॅग तपासण्यात आली आहे. यावरून आता विविध राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही यावरून उद्धव ठाकरे यांच्यावर खोचक टीका केली आहे. भांडूपमधील सभेत बोलताना त्यांनी यासंदर्भात भाष्य केलं

काल आणि आज उद्धव ठाकरेंची बॅग तपासली. खरं तर निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांना कुठं काय तपासावं हेसुद्धा कळत नाही. ज्या व्यक्तीच्या हातातून कधी पैसे सुटला नाही, त्या व्यक्तीच्या बॅगेत काय असणार आहे? फार फार तर हात रुमाल आणि कोमट पाणी, याशिवाय दुसरं काहीही असू शकत नाही”, अशी खोचक टीका राज ठाकरे यांनी केली पुढे बोलताना ते म्हणाले, की “उद्धव ठाकरेंची बॅग तपासल्यानंतर आता त्याचा मोठा बाऊ केला जातो आहे. मुळात बॅग तपासण्यात गैर काय? अनेकदा आमच्याही बॅगा तपासण्यात आल्या. निवडणूक अधिकारी त्यांचं काम करत असतात. त्याचा एवढा तमाशा करायची गरजं नाही. त्यातही ते संबंधित अधिकाऱ्यांचा व्हिडीओ काढतात. त्याला नियुक्त पत्र दाखवायला सांगतात, मुळात कोणताही अधिकारी नियुक्ती पत्र घेऊन फिरतो का? कुणाला काय विचारावं, हेही उद्धव ठाकरेंना माहिती नाही. त्यांना फक्त मुख्यमंत्रीपद हवं आहे. या लोकांनी सगळा तमाशा करून ठेवला आहे”, अशी टीकाही राज ठाकरे यांनी केली.

error: Content is protected !!