पुण्यातील मोदींच्या सभेत मराठा आंदोलकांचा गोंधळ
पुणे – मराठा आरक्षणामुळे महाराष्ट्रातील मराठा समाज राज्य आणि केंद्र सरकारवर किती नाराज आहे याची प्रचीती आज पंतप्रधान मोदींना आली. आज पुण्यातील मोदींच्या सभेत मराठा आर्क्षकानी गोंधळ घातला.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेतही व्हिआयपी रांगेत बसलेल्या एका कार्यकर्त्याने मराठा आरक्षणाबाबत जोरदार घोषणाबाजी केल्याचा प्रसंग घडला. पोलिसांनी तत्काळ या घोषणाबाजी करणाऱ्याला ताब्यात घेतलं.पण यामुळे काहीवेळ सभास्थळी गोंधळाचं वातावरण निर्माण झाल्याचं दिसून आलं.
पुणे जिल्ह्यातील महायुतीच्या उमेदवारांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींची पुण्यातील एसपी महाविद्यालयाच्या मैदानावर झालेल्या सभा झाली. पण मोदींच्या सभास्थळी एका मराठा बांधवानं जोरदार घोषणाबाजी करत मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन रान पेटवण्याचा प्रयत्न केला.या कार्यकर्त्याने मराठा आरक्षण भेटलंच पाहिजे अशी आग्रही भूमिका मांडली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी महायुतीच्या प्रचारार्थ सभेत भाषण सुरू होतं.त्याचवेळी पिवळ्या रंगाचं जॅकेट घातलेल्या या कार्यकर्त्याने आक्रमक पवित्रा घेत एक मराठा,लाख मराठा,कोण म्हणतं देत नाही,घेतल्याशिवाय राहणार नाही याप्रकारच्या घोषणा केल्याचं पाहायला मिळालं.मात्र,त्यामुळे सभास्थळी असलेल्या पोलिसांची व सुरक्षारक्षकांची, महायुतीच्या कार्यकर्त्यांची चांगलीच धावपळ झाली.संबंधित मराठा आंदोलकाला पोलिसांनी खाली बसण्याची विनंती केली.पण तरीही तो आक्रमक होत घोषणाबाजी सुरुच ठेवली. त्यामुळे अखेर पोलिस व महायुतीच्या कार्यकर्ते या व्यक्तीला शांत करत सभास्थळापासून दूर घेऊन गेले.पण या प्रकाराची पुण्यासह संपूर्ण राज्याच्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली होती.