लोक असतील तरच आम्हाला महत्व नाय तर कुत्राही विचारणार नाही – अजित पवार
पुणे – सभेला आलेल्या लोकांना दमदाटी करणाऱ्या पोलिसांवर आज अजितदादा चांगलेच भडकले . ते म्हणाले लोक आमच्या मागे असतील तरच आम्हाला महत्व अन्यथा कुत्राही विचारणार नाही तेंव्हा लोकांना त्रास देऊ नका असे अजित पवारांनी पोलिसांना दरडावले
भोर येथे भाषण करत असताना अजित पवारांची नजर बाजूला उभ्या असलेल्या लोकांवर गेली. स्टेजसमोर मोकळ्या जागेत उभ्या असलेल्या लोकांना बसायची परवानगी द्या, असे सांगून अजित पवार पोलिसांवर डाफरले. ते म्हणाले, “ये, पोलिसांनो त्या लोकांना सोडा. ती माझी लोकं उभी आहेत. त्यांना कोण अडवतं, ते बघतो. सोडा त्यांना. मला झेड दर्जाची सुरक्षा आहे, मी सांगतोय त्यांना इथं बसवा. लोकं उभी राहत आहेत. हा कुठला न्याय. आमच्यामागं लोक असतील तर आम्हाला महत्त्व. नाहीतर कोण कुत्रही विचारणार नाही आम्हाला
शरद पवार यांचे कट्टर विरोधक अशी ओळख असलेले माजी मंत्री अनंतराव थोपटे यांचे चिरंजीव, काँग्रेसचे भोर विधानसभा मतदारसंघाचे आमदार संग्राम थोपटे यांचा लोकसभेला पाठिंबा मिळावा यासाठी सुनेत्रा पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी अनंतराव थोपटेंची भेट घेतली होती. मात्र शेवटी शरद पवार यांनी स्वतःहून थोपटेंची भेट घेऊन समेट घडवून आणला होता. त्यामुळे भोर-वेल्हे-मुळशी येथून सुप्रिया सुळे यांना पाठिंबा मिळाला.
याच सभेत बोलत असताना अजित पवार म्हणाले की, भोर तालुक्यात आल्यावर मला लाज वाटते. काय इथलं बसस्थानक? एकदा माझ्या बारामतीमध्ये येऊन आमचं बसस्थानक बघा. विकास बघा. मी याआधीही राजगड सहकारी साखर कारखाना माझ्या लोकांच्या हाती द्या, असे सांगितले. पण तुम्ही ऐकलं नाही. आज इतर कारखाने पुढं गेले. पण राजगडची अवस्था वाईट आहे. भोरवासियांना मी साष्टांग दंडवत घालतो. इतकी असुविधा असूनही तुम्ही एकाच माणसाला निवडून देता. तुमची कधी सटकणार? असा सवाल अजित पवार यांनी विचारला.