भाजपचे आता मिशन मुंबई महानगरपालिका
मुंबई/महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत 132 जागा जिंकून घवघवीत यश मिळवणाऱ्या भाजपचे आता मुंबई महानगरपालिकेवर लक्ष असून कोणत्याही परिस्थितीत मुंबई महानगरपालिका ताब्यात घेण्यासाठी भाजपाने कंबर कसली आहे त्यासाठी नियोजन पद्धतीने मोर्चे बांधणी केली जाणार आहे त्यामुळे यंदाची महानगरपालिका भाजप जिंकणार अशी शक्यता आहे
विधानसभा निवडणुकीत मुंबईच्या छत्तीस जागांपैकी भाजपाने 15 जागा जिंकलेले आहे तर मुंबईवर अधिराज्य गाजवणाऱ्या शिवसेनेच्या ठाकरे गटाला अवघ्या दहा जागा जिंकता आल्या आहेत या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिका कोणाकडे जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे मुंबई महानगरपालिकेची निवडणूक 2017 झाली होती त्यानंतर 2022 मध्ये कोरोनाची लाट आल्याने आणि त्यानंतर प्रभाग रचनेमध्ये बदल झाल्याच्या कारणाने महापालिका निवडणुका विधानसभा निवडणुकीनंतर घ्यायचे ठरले त्यानंतर आता विधानसभा निवडणुका पार पडल्या त्यामुळे आता महाराष्ट्रातील मुंबई सह सर्व महानगरपालिका नगरपालिका यांच्या निवडणुका होणार आहेत त्यासाठीच भाजपाने जोरदार मोर्चा बांधणी सुरू केलेली आहे यावेळी मुंबई महानगरपालिकेतील काही मोठे नगरसेवक भाजपात दाखल झालेले आहेत काँग्रेसचे रवी राजा हे मुंबई महानगरपालिकेत गेले अनेक वर्ष सक्रिय आहे तसेच इतरही काही नगरसेवक भाजपकडे आलेले आहे या सर्व पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिका जिंकण्यासाठी भाजपाने कंबर कसली असून यावेळी मुंबई महानगरपालिकेवर भाजपचा झेंडा फडकणार असे दिसत आहे