महायुतीत मुख्यमंत्री पदावरून धमासान सुरु ! फडणवीस कि शिंदे ?
मुंबई – विधानसभा निवडणुकीत महायुतीने बम्पर यश मिळवले आहे. त्यामुळे त्यांचे सरकार येणार हे जवळपास नक्की असले तरी आता मुख्यमंत्री पदावरून वाद सुरु झाले आहेत. १३२ जागा जिंकणारी भाजपने मुख्यमंत्रीपदावर दावा केला आहे. तर दुसरीकडे एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपद सोडायला तयार नाही. त्यामुळे भाजपा नेत्यांकडून त्यांची समजूत काढण्याचे पयत्न सुरु आहेत तर अजित पवार गटाने भाजपला पाठिंबा दिल्याने शिंदेंच्या शिवसेनेची बार्गेनिंग पवार कमी केली आहे .
भाजपचे दिल्लीतील वरीष्ठ नेते देखील हिवाळी अधिवेशनात व्यस्त दिसत आहेत. यंदाच्या अधिवेशनात अनेक महत्त्वाची विधेयकं मांडली जाणार असल्याची माहिती आहे. भाजपला महाराष्ट्रात मिळालेलं यश मोठं आहे. अशात सत्तास्थापनेसंदर्भात विरोधकांची देखील दिल्लीतील नेत्यांची चिंता मिटल्याने भाजपकडून घाई न करता वेळ घेत असल्याची चर्चा आहे. सोबतच मुख्यमंत्रीपदासंदर्भात तिन्ही पक्षांसोबत दिल्लीतील नेते चर्चा करणार असल्याने कोणी नवा चेहरा दिला जातो का यासंदर्भात देखील तर्कवितर्क लावली जात आहेत. सव्वाशेहून अधिक जागा जिंकल्याने भाजपचा मुख्यमंत्रीपदावर दावा आहे. दुसरीकडे मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात लढल्याने हे यश मिळाल्याचा दावा शिवसेना करत आहे. सोबतच शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री व्हावे म्हणून आक्रमक होत असताना यासंदर्भात सावध पाऊलं टाकली जात असल्याचं दिसतं.
सव्वादोनशेहून अधिक जागा जिंकत सत्तेत आलेल्या महायुतीचा मुख्यमंत्रिपदावरुन पेच कायम आहे. एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांची शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेतेपदी निवड झाली असली तरी भाजपचा यासंदर्भात निर्णय होऊ शकलेला नाही. त्यामुळे जोपर्यंत दिल्लीतील नेत्यांकडून हालचाली होत नाहीत तोपर्यंत मुख्यमंत्री पदाबाबतचा निर्णय देखील होऊ शकत नाही अशी परिस्थिती आहे. त्यामुळे दिल्लीतील नेते निर्णय कधी घेतात आणि मुख्यमंत्रिपदी कोणाची वर्णी लागते हे बघणं महत्त्वाचं असेल.