संभल मध्ये सपाच्या शिष्टमंडळाला प्रवेश नाकारला
मुरादाबाद/संभल येथील मशिदीच्या सर्वेक्षणावरून उसळलेल्या हिंसाचारात पाच जणांचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची माहिती घेण्यासाठी समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी एक शिष्टमंडळ संभलला पाठवण्याचा निर्णय घेतला होता परंतु शनिवारी या शिष्टमंडळाला पोलिसांनी संबळ मध्ये प्रवेश करण्यास मनाई केली आहे .
संभल हिंसाचाराबद्दल समाजवादी पक्षाने आक्रमक भूमिका घेतली आहे आज समाजवादी पक्षाचा एक शिष्टमंडळ मध्ये जाऊन तिथला अहवाल पक्षप्रमुख अखिलेश यादव यांना देणार होते त्यानंतर त्याच अहवालाच्या आधारे अखिलेश यादव पुढील आंदोलनाची दिशा ठरवणार होती त्यानुसार माता प्रसाद यादव यांना पोलिसांनी त्यांच्या घरातून बाहेरच पडायला दिले नाही त्यावरून पोलीस आणि समाजवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार बाचाबाची झाली. त्यामुळे वातावरण तापलेले आहे याच तापलेल्या वातावरणाचा भडका उडू नये म्हणून संपूर्ण उत्तर प्रदेश मध्ये सुरक्षेच्या कडे कोट उपाय योजना करण्यात आलेले आहेत . प्रकरणात राज्य सरकारने नेमलेल्या चौकशी आयोगाने आजपासूनच आपले काम सुरू केलेले आहे हा चौकशी आयोग सब्बल दंगलीची चौकशी करून त्याचा अहवाल मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना देईल आणि त्या अहवालाच्या आधारे पुढे कारवाई केली जाईल