ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

प्रत्येक जोडप्यांनी ३ मुले जन्माला घालावीत – मोहन भागवतांचा हिंदुना सल्ला

नागपूर – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी देशातील लोकसंख्येबाबत चिंता व्यक्त केली. लोकसंख्या घटणे ही चिंतेची बाब आहे. आधुनिक लोकसंख्या विज्ञान सांगते की जेव्हा एखाद्या समाजाची लोकसंख्या (प्रजनन दर) २. १ च्या खाली जाते, तेव्हा तो समाज पृथ्वीवरून नाहीसा होतो. त्यामुळे प्रत्येक जोडप्याने दोन किंवा तीनपेक्षा जास्त मुलं जन्माला घालायला हवीत, हे महत्त्वाचे आहे, असे मोहन भागवत म्हणाले. ते नागपूरमध्ये बोलत होते.

नागपुरातील कठाळे परिवाराच्या सामाजिक कार्याला २५ वर्ष पूर्ण झाली. त्यानिमित्त कठाळे कुल संमेलनाचं आयोजन करण्यात आलं. यावेळी मोहन भागवत यांनी उपस्थितांना संबोधित केले. त्यावेळी त्यांनी लोकसंख्याबाबत चिंता व्यक्त केली.लोकसंख्येतील घट ही चिंतेची बाब आहे. आधुनिक लोकसंख्या विज्ञान सांगते की जेव्हा एखाद्या समाजाची लोकसंख्या (प्रजनन दर) २.१ च्या खाली जाते तेव्हा तो समाज पृथ्वीवरून नाहीसा होतो. संकट नसतानाही तो समाज नष्ट होतो. त्यामुळे अनेक भाषा आणि समाज नष्ट झाले आहेत. लोकसंख्या २. १ च्या खाली जाऊ नये, आपल्या देशाचे लोकसंख्या धोरण १९९८ किंवा २००२ मध्ये ठरविण्यात आले होते. परंतु त्यात असेही म्हटले आहे की समाजाची लोकसंख्या २. १ पेक्षा कमी नसावी. आपल्याला दोन किंवा तीनपेक्षा जास्त हवे आहेत, हे लोकसंख्या विज्ञान सांगते. संख्या महत्त्वाची, आहे कारण समाज टिकला पाहिजे.

error: Content is protected !!