विधानसभेच्या विशेष अधिवेशनात आमदारांचा शपथविधी सुरू- सोमवारी अध्यक्षांची निवड होणार त्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार
मुंबई/महाराष्ट्र विधानसभेच्या नवनिर्वाचित 288 आमदारांचा विशेष विधानसभा अधिवेशनात आजपासून शपथविधी सुरू झालेला आहे रविवारी दुपारपर्यंत हा शपथविधी चालणार आहे सभागृहातील ज्येष्ठ आमदार कालिदास कोळमकर यांची विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदी निवड झालेली आहे आणि त्यांच्याच देखरेखी घाली सर्व नवीन आमदारांचा शपथविधी होणार आहे यंदा 78 नवीन आमदार निवडून आलेले आहेत या सर्वांसाठी विधानसभा निश्चितपणे उत्सुकतेचा विषय असणार आहे शपथविधीनंतर सोमवारी विधानसभा अध्यक्षांची निवड केली जाईल यावेळी ही भाजपाचे राहुल नार्वेकर यांचीच विधानसभा अध्यक्षपदी निवड होण्याची शक्यता आहे विधानसभा अध्यक्षाच्या निवडीनंतर मंत्री मंडळातील सदस्य आणि त्यांचे खाते व खाते वाटप जाहीर होईल आत्तापर्यंत मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री अशा तिघांनी शपथ घेतलेली असल्याने आता 40 मंत्र्यांचा शपथविधी होणे बाकी आहे तो लवकरच होईल भाजपा हा सभागृहातील 132 आमदार असलेला सर्वात मोठा पक्ष आहे त्यामुळे त्यांच्या वाट्याला अधिक मंत्री पद जाण्याची शक्यता आहे ज्या गृहमंत्री पदावरून वास सुरू होता ते भाजपाकडेच म्हणजेच मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडेच राहणार आहे