बाटलीबंद पाण्यात व्हायरस ?
मे महिन्यात कडक उन्हाळा आणि अशावेळी उन्हाच्या झळांनी सर्वच कासावीस होत असतात.मुंबईत यावेळी तापमानाचा पारा ४५ च्या पार झालेला असतो.अशावेळी मुंबई महापालिकाही मु़ंबईकरांना, गरजेशिवाय घराबाहेर पडू नका असा सावधानतेचा इशारा देत असते.त्याचबरोबर तहान लागलेली नसली तरीही किमान ६ ते ७ लिटर पाणी पिण्याचा सल्लाही देत असते.
अतिउष्म्यामुळे अंगाची लाहिलाही होत असते. याचबरोबर घशालाही कोरड रडत असते.त्यामुळे मिळेल ते पाणी पिऊन लोक आपली तहान भागवत असतात. असतात. अशास्थितीत मुंबईसारख्या शहरी भागात आरोग्याची काळजी घेण्यासाठी आपण बाटलीबंद थंडगार पाणी पितो.परंतु हे पाणी कसे आहे व ते कुठून येते.ते स़पूर्ण निर्जंतूक व क्षारयुक्त आहे का याची आपण कोणतीही खातरजमा न करता ते घटा घटा पिऊन घशाखाली उतरवून आपली तहान भागवतो.पण हे पाणी तहान भागवतानाच अनेक आजारांना निमंत्रण देते हे आपल्याला माहित नसते.हे पाणी शुद्ध नसते व त्यापासून किती घातक आजार उद्भवू शकतात हे ऐकून सर्वांनाच घाम फुटेल.
मुंबईसह राज्यभरात अशा बाटलीबंद पाण्याच्या लाखो बाटल्यांची आज सर्रास विक्री होत आहे.त्यातून कोट्यावधी रूपयांची उलाढाल सुरू आहे. पैशाच्या या हव्यासापायी नागरिकांच्या जीवाशी क्रूर खेळ सुरू असल्याचे प्रयोगात आढळून आले आहे.नमुन्या दाखल दोन बाटल्या मु़ंबई महापालिकेच्या प्रयोगशाळेत दिल्या असता त्यत “कोलीफार्मा” हा विषाणू आढळला.
दुकाने,हॉटेल,कॉर्पोरेट कार्यालये आणि लग्नसमारंभात उन्हाळ्यात लाखो पाण्याच्या बाटल्यांचा वापर होतो.पाणी शुद्ध असल्याचा बनाव करत बाटल्यांमधून बिनधास्तपणे कूपनलिका (बोअरवेल), विहिरींचे पाणी विकले जात आहे.वसई,भिवंडी,मिरारोड,
रायगड,दापोली,खेड या भागात बाटलीबंद पाण्याचे बेकायदा कारखाने सुरू आहेत.रेल्वेने शुद्ध पाण्याचा “नीर” चा उद्योग सुरू केला असला तरी लोकलमध्ये फिरून अनेक विक्रेते बनावटबाटलीबंद पाणी विकत आहेत.अशाप्रकारच्या बाटलीबद पाण्याची विक्री करण्यापूर्वी ऑथॉरिटी ऑफ इंडिया (बीआयएस)फूड सेफ्टी अँड स्टँडर्डस् अॅथॉरिटी ऑफ इंडिया (एफएसएसएआय) यांच्या परवानग्या घ्याव्या लागतात.त्या न घताच या बाटलीबंद पाणी राज्यात चांद्यापासून बांद्यापर्यंत सर्रासपणे विकले जात आहे. वर्षाला १२०० कोटींची उलाढाल असलेल्या या पाणी उद्योगात बनावट बाटलीबंद उद्योजकांनी खोडा घातला आहे.भरमसाठ नफा कमविण्यासाठी विहिरी, बोअरवेल्समधील पाणी बाटल्यात भरून ते विकले जात आहे.
परवाना बहाल करणा-या सरकारी यंत्रणा आहेत त्यांनी या सर्व बनावट बाटलीबंद उद्योगांकडे चक्क काणाडोळा केला आहे.या यंत्रणांच्या डोळ्यात अंजन घालण्यासाठी एका वर्तमानपत्राने बनावट बाटलीबंद पाण्याचे कारखाने सर्वाधिक असलेल्या विरारमधून दोन बाटल्या नमुन्यादाखल विकत घेतल्या.”आयएसआय” हे बोधचिन्ह (लोगो )असलेल्या स्कववीझम् अक्वानिम्फ या ब्रँडचे हे पाणी होते.नावाजलेल्या ब्रँडप्रमाणेच त्यांच्या किंमती आहेत.तहानलेल्या व्यक्ती या बाटल्या कोणतीही शहानिशा न करता डोळे झाकून विकत घेतात आणि पाणी पिऊन बाटल फेकून देतात.या बाटलीबंद पाण्याच्या बाटल्या ह्या यज अँड थ्रो असतात.एकदा वापरल्यानंतर त्यांचा पुनर्वापर न करता त्याफ्कन द्यावयाच्या असतात.परंतु याच बाटल्या गोळा करून त्यात कुठलेही पाणी भरून ते लोकांना विकले जाते.
या पाण्याची शुद्धता तपासण्यासाठी बृहन्मुंबई महानगर पालिकेच्या दादर येथील “जी” उत्तर विभाग कार्यालयातील अद्ययावत प्रयोगशाळेत रितसर अर्ज करून एका वृत्तपत्राने बाटल्यांकचे नमुने दिले.प्रामुख्याने हे पाणी पिण्यायोग्य आहे की नाहीे हे तपासण्यात आले.मुंबईतील एकमेव सरकारी प्रयोगशाळेचा हा अहवाल धक्कादायक आहे.बाटलीबंद पाणी अणुजैविक शास्त्रीय (मायक्रोबायोलॉजिकल)
चाचणीत पिण्यायोग्य नसल्याचे सिद्ध झाले आहे.दोन्ही बाटल्यात ” कोलीफार्म” विषाणू आढळला असून हे पाणी पिण्यायोग्य नसल्याचा निष्कर्ष प्रयोगशाळेने अहवालात काढला आहे.
“कोलीफार्म” म्हणजे काय ?
विषाणू चार प्रकारचे असतात. “ई -कोलाय” विषाणू सारखे बॅक्टर´,
इन्ट्रोबक्टर´ व केपेला´ हा समूह आहे.पर्यावरणात ते विपूल प्रमाणात आढळतात.ते पाण्यात असल्यास आरोग्याला अपाय होऊ शकतो.अर्थात हे प्रत्येकाच्या रोगप्रतिकारक शक्तीवरही अवलंबून आहे.
कुलजार´, कुलकब´ राज्याच्या अनेक भागात कुलजारमधून थंडगार पाणी पोहचवले जाते .ग्राहकांकडून अनामत रक्कम घेऊन दर महिन्याला त्या कंपनीला पैसे दिले जातात.मुंबईतही अनेक कंपन्यांच्या कार्यालयामध्ये अशाप्रकारे "कुल जार " मोठ्याप्रमाणात पुरविले जातात.आता कायद्याच्या चौकटीत
पॅकेज ड्रिकिंग वॉटर ´ असल्याने “कुल जार” चे उद्योग वाढीला लागले आहेत.विहिर व बोअरवेलचे पाणी यासाठी सर्रास वापरले जाते.कायद्याच्या चौकटीत येत नसल्याने “▪एफडीए” च्या अधिका-यांना अशा बनावट पाणी भरून विकणा-या कारखान्यांवर कारवाईही करता येत नाही .
बाटलीबंद पाणी संघटनेचे
अध्यक्ष विजयसिंह दुग्गल यांनी सांगितले की, बनावट बाटलीबंद पाण्याच्या कारखान्यावर कारवाई करण्यास अधिकारी धजावत नाहीत
बनावट बाटलीबंद पाण्याचा हा व्यवसाय इता बोकाळला असताना आणि लोकांच्या जीवाशी हे व्यावसायिक जीवघेणा क्रूर खेळ खेळत असताना सरकारी यंत्रणा याकडे पूर्णत: डोळेझाक करून व मूग गिळून गप्प बसल्याचे दिसून येत आहे.यावरून त्यातील काहींचे या व्यावसायिकांशी आर्थिक हितसंबंध गु़ंंतलेले नाहित ना अशी शंका अनेकजण व्यक्त करताना दिसत आहेत.
तेव्हा मुंबईकरांनो अतिउष्माघाताचा त्रास टाळण्यासाठी सरकारी यंत्रणांनी, तहान लागलेली नसली तरी दिवसाला ६-७ लिटर पाणी पिण्याचा जो सल्ला दिलाय तो जरी योग्यच असला तरी आपण जे पाणी पितोय ते कसले आहे याची खातरजमा करून प्या.अन्यथा बनावट बाटलीबंद पाण्यातील घातक व्हायरसमुळे भयंकर आजाराला निमंत्रण मिळू शकेल, हे ध्यानात असू द्या.दूषित पाण्यामुळे आजाराला बळीष नये यासाठी तुम्हालाच स्वत:ची काळजी घ्यावी लागेल.
– राजेंद्र साळसकर