ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

उद्धव ठाकरेंनी घेतली देवेंद्र फडणवीस व राहुल नार्वेकरांची भेट

नागपूर – शिवसेनेतील फुटीनंतर गेली अधिज वर्ष फडणवीसांच्या नावाने खडी फोडणारे उद्धव ठाकरे यांनी आज नागपुरातील विधानसभा अधिवेशनात मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली . इतकेच नव्हे तर त्यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचीही भेट घेतली त्यामुळे राजकीय वर्तुळात उलट सुलस्ट चर्चाना उधाण आले आहे. पण हि सदिच्छा भेट होती असे दोन्हीकडून सांगितले जात आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विधानसभा अध्यक्ष ॲड राहुल नार्वेकर यांच्यासोबत आज झालेली भेटी ही सदिच्छा भेट होती. एखाद्या पक्षासंदर्भात असलेली भूमिका आणि टीका विसरून राज्याच्या प्रमुखांना भेटणं, हे सकारात्मक राजकारण आगामी काळात पुढच्या दिशेन जाऊ शकतं. ते जात असेल तर त्याचे सर्वांनी स्वागतच केले पाहिजे, असे सूचक विधान शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार सचिन अहिर यांनी केले.
सचिन अहिर म्हणाले, सरकारचं अभिनंदन करण्यात आलं. या भेटीत अनौपचारिक चर्चा झाली. या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झालेली नाही. महाराष्ट्रहिताचं काम तुमच्याकडून झालं पाहिजे आणि ते झालं नाही तर विरोधी पक्ष या नात्याने आमची भूमिका मांडत राहू, असेही या भेटीत सांगण्यात आलं.
शिवसेनेचा हिंदुत्वाचा मुद्दा नेहमीच राहिलेला आहे. ज्या ज्यावेळी असा प्रसंग आला, त्या त्या वेळी आम्ही आमची हिंदुत्वाची भूमिका मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता विषय तसे आलेले आहेत.आता समजा हनुमान मंदिराचा प्रश्न आला नसता तर आम्हाला तो विषय उचलायची गरज लागली नसती. जाणूनबुजून विषय तयार करून ते विषय उचलण्याची गरज नाही, असे स्पष्टीकरणही अहिर यांनी दिले.

error: Content is protected !!