ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

काँग्रेसने सत्याला असत्याची कपडे घातले – डॉ. आंबेडकर अपमान प्रकरणी अमित शहांचा विरोधकांवर पलटवार

नवी दिल्ली – केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी बुधवारी काँग्रेसवर जोरदार पलटवार केला. त्यांच्या राज्यसभेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांविषयी केलेल्या विधानावरून राजकारण तापले असून काँग्रेसने राजीनाम्याची मागणी केली आहे. त्याला प्रत्युत्तर देताना शाह यांनी काँग्रेसने सत्याला असत्याची कपडे घालून संभ्रम निर्माण केल्याचा आरोप शाह यांनी केला आहे.
शाह यांनी बुधवारी सायंकाळी पत्रकार परिषद घेत काँग्रेसवर हल्लाबोल चढवला. ते म्हणाले, संविधानाला स्वीकारलेल्या घटनेला ७५ व्या वर्षानिमित्त संसदेत चर्चेचे आयोजन करण्यात आले होते. या चर्चेदरम्यान सर्व मुद्द्यांवर चर्चा झाली. प्रत्येक मुद्द्यावर सदस्यांची, पक्षांची भूमिका वेगळी असते. पण संसदेत चर्चा होत असताना कोणतेही भाष्य तथ्यावर आधारीत असावी. कालपासून काँग्रेसने तथ्यांची मोडतोड करून मांडल्याने ते निंदनीय आहे, असे शाह म्हणाले.
भाजपच्या सदस्यांनी संविधाना आणि त्याच्या मुल्यांवर आणि जेव्हाजेव्हा भाजपच्या सत्तेच्या काळात भाजपने त्याचे कसे संरक्षण केले, यावर तथ्यांसह मांडणी केली. यामध्ये काँग्रेस आंबेडकरविरोधी, आरक्षणविरोधी, संविधानविरोधी पक्ष असल्याचे सिध्द झाले. काँग्रेसने सावकरांचाही अपमान केला. आणीबाणी आणून संविधानाचा अपमान केला. न्यायव्यवस्था, महिला, सैन्याचा अपमान केल्याचा निशाणा शाह यांनी साधला.
हे सत्य समोर आल्यानंतर काँग्रेसने कालपासून पुन्हा आपल्या जुन्या पध्दतीने काही गोष्टींची मोडतोड करून सत्याला असत्याची कपडे घालून मांडले. काँग्रेसने कशापध्दतीने आंबेडकरांचा विरोध केला हे सिध्द झाले. भाजपचा पाठिंबा असलेल्या सरकारने आंबेडकरांना भारतरत्न दिले. तोपर्यंत काँग्रेसचा त्याला विरोध होता. नेहरूंचा आंबेडकरांना असलेला विरोध जगजाहीर आहे, अशी टीका शहांनी केली. यावेळी शहांनी अनेक संदर्भही दिले.

error: Content is protected !!