संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपी – आरोपी वाल्मिक कराडला मोक्का लावणार ?
r
नागपूर – महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सभागृहात बीडच्या केज येथील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावर भूमिका मांडली. त्यांनी या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड याचं नाव घेतलं. “आपण वारंवार वाल्मीक कराडच नाव घेतलं म्हणून नाव घेऊन सांगतो या गुन्ह्यामध्ये तर त्याचा पुरावा दिसतोच आहे. त्याच्यावर कारवाई होणारच आहे. पण देशमुख यांच्या हत्येप्रकरणात वाल्मीक कराड बद्दलचे पुरावे असतील तर तो कोण आहे, कुठल्या पक्षाचा आहे, कुणाकुणासोबत फोटो आहेत, सगळ्यांसोबत होते, आमच्यासोबत आहे, यांच्यासोबत पवार साहेबांकडे सोबत फोटो आहे याचा विचार न करता कारवाई केली जाईल”, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सभागृहात दिली. तसेच या प्रकरणातील सर्व आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाई होईल, अशी महत्त्वाची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली. तसेच आयजी दर्जाच्या अधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखाली एसआयटी स्थापन करुन चौकशी केली जात असल्याचं फडणवीसांनी जाहीर केलं.या प्रकरणी अद्यापपर्यंत चार आरोपी अटकेत असून आणखी तीन आरोपी फरार आहेत. हत्याकांडाच्या घटनेला बारा दिवस उलटूनही सर्व आरोपींना अटक झालेली नाही. त्यांच्या पाठीमागे राजकीय वरदहस्त असल्याची शंका निर्माण होत आहे. मुख्य सूत्रधाराला अटक करण्यात यावी, असा आर्त टाहो तिने फोडला आहे.या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील यांना निलंबित केलेले आहे. तर केज पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले होते. त्याच बरोबर जिल्हा पोलिस अधीक्षक अविनाश बारगळ यांची देखील बदली करण्यात आली असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संतोष देशमुख हत्याकांडाच्या प्रश्नावर चर्चेला उत्तर देताना सभागृहात केली आहे.. संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणातील मुख्य सूत्रधाराला तत्काळ अटक करून त्यांना कठोर शासन करा. माझे वडील आदर्श व्यक्ती होते. त्यांच्या सर्व मारेकऱ्यांना फासावर लटकवा, असा आर्त विनवणी मृत संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी देशमुख हिने केली आहे.