मराठी कुटुंबाला मारहाण करणाऱ्या मुजोर परप्रांतीय अधिकाऱ्याला अटक ! नोकरीतूनही निलंबित
कल्याण – कल्याणमधील मराठी कुटुंबाला मारहाण करून मराठी माणसाला भिकारी म्हणून हिणवणाऱ्या मुजोर सरकारी अधिकारी अखिलेश शुक्लाच्या आज पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. . शुक्लासोबत आणखी दोघांनाही अटक करण्यात आली आहे.तसेच शुक्लाला सरकारी सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. राज ठाकरे यांनीही अशा मुजोर परप्रांतीयांवर कठोर कारवाई केली नाही तर आम्ही त्यांना आमच्या पद्धतीने धडा शिकवू असा इशारा दिला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कल्याणच्या अजमेरा हाईट्स इमारतीत राहणारा महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी अखिलेश शुक्ला याने शेजारी राहणाऱ्या देशमुख कुटुंबावर हल्ला केला होता. या प्रकारानंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली होती. या प्रकरणा शुक्लाने देशमुख कुटुंबातील दोन भावांना लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली होती. हीच मारहाण करणाऱ्या शुक्लाला अटक करण्यात आली आहे.
क ल्याणमधील देशमुख कुटुंबाला मारहाण करणाऱ्या अखिलेश शुक्लाला अखेर पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. अखिलेशला नेमकं खडकपाडा पोलिसांनी कुठून ताब्यात घेतलं, याची माहिती समोर आलेली नाही. अखिलेश शुक्लाच्या मारहाणीचा मुद्दा सभागृहातही गाजला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अखिलेश शुक्लाला निलंबित केल्याची माहिती दिली. तसेच त्याच्यावर गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे.
अखिलेश शुक्लाने मराठी कुटुंबाला केलेल्या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या प्रकारानंतर महाराष्ट्रात जनक्षोभ उसळला होता. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील कठोर कारवाईची मागणी केली होती. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घटनेचा निषेध केला होता. तसेच हा महाराष्ट्र हा मराठी माणसांचा अपमान आहे, असं सांगून शुक्लावर कारवाईचे आदेश दिले होते. पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर आरोपी अखिलेश शुक्ला याला खडकपाडा पोलीस ठाण्यात आणले गेले. त्यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त होता