ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबईराजकीय

पूरग्रस्तांसाठी साडे अकरा हजार कोटींची मदत जाहीर

पूरग्रस्तांसाठी साडे अकरा हजार कोटींची मदत जाहीर
*पूर्ण घर उध्वस्त झालेल्यांना दीड लाख रुपये-*अंशत घरांचे नुकसान झालेल्या ५० ते २५ हजार–टपरी धारकांना १० हजार–*पूरग्रस्त कुटुंबाला १० हजार–*दुकानदारांना ५० हजार

मुंबई/ पूरग्रस्त भागातील जनतेला अखेर महाराष्ट्र सरकारने साडे अकरा हजार कोटींचे मदत पॅकेज जाहीर केले आहे .धनादेशाद्वारे जाहीर मदत पूरग्रस्तांच्या खात्यात जमाकेली जाणार आहे मात्र ही मदत खूपच अपुरी असल्याने पूरग्रस्तनी नाराजी व्यक्त केली आहे
पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात अतिवृष्टी मुले आलेला महापूर तसेच भुसखला यामुळे रायगड,रत्नागिरी,सिंधुदुर्ग,सांगली,सातारा,कोल्हापूर, या जिल्ह्याचे प्रचंड नुकसान झाले होते. या नैसर्गिक आपत्तीत १५० लोकांचा मृत्यू झाला होता तर जवळपास चार लाख हेक्टर शेतीचे नुकसान झाले होते .चिपळूण शहर पाण्याखाली गेले होते तर कोल्हापुरातील पूरपरिस्थिती मुळे मुंबई -बंगलोर महामार्ग पाच दिवस बंद होता .मुंबई गोवा महामार्ग बंद ठेवण्यात आला होता . कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील अनेक गावांमध्ये पुराचे पाणी शिरल्याने प्रचंड नुकसान झाले होते. त्यानंतर मुख्यमंत्री,उप मुख्यमंत्री यांनी पूरग्रस्त भागाची पाहणी करून तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिले होते. आतापर्यंत ८० टक्के पंचनामे पूर्ण झाले असून काल राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार व नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेत मदत पूरग्रस्तांसाठी साडे अकरा हजार कोटींचे मदत पॅकेज जाहीर केले. त्यानुसार ज्यांची पूर्ण घरे पडलीत त्यांना दीड लाख तर अंशात घरांचे नुकसान झालेल्यांसाठी ५० ते २५ हजार मदत देण्यात येणार आहे तसेच पूरग्रस्त कुटुंबांना १० हजारांची तर दुकानदारांना ५० हजारांची मदत दिली जाणार आहे. टपरी वाल्यांना १० हजाराची मदत दिली जाणार आहे . ज्या भागात दरडी कोसळून घरे कोसळली अशा भागातील लोकांना साडेचार लाख पर्यंतची घरे म्हाडा बांधून देणार आहे .अजून शेतीच्या नुकसानी बाबत चां संपूर्ण अहवाल आले नाही. तो तीन दिवसात येण्याची शक्यता आहे मात्र सरकारची ही मदत अत्यंत तुटपुंजी असल्याचे पूरग्रस्ताचे म्हणणे आहे
.

/ मुंबईकरांनी लोकल ट्रेन चां प्रवास विसरावा

मंत्र्यांच्या दौर्‍यातील गर्दी चालते पण लोकलमधील नाही त्यामुळे लोकल बंदी कायम
मुंबई आणि मुंबई बाहेरून कामा धंद्याला येणाऱ्या लाखो लोकांची प्रचंड गैरसोय होत आहे हे दिसत असतानाही महा विकास आघाडी सरकार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्याकडे लक्ष द्यायला तयार नाहीत त्यामुळे सर्वसामान्य मुंबईकरांसाठी इतक्यात लोकल ट्रेन चा प्रवास परवानगी मिळणार नाही.त्यामुळे सर्वसामान्य मुंबईकरांनी लोकल प्रवास आता विसरावा निदान टास्क फोर्स असे पर्यंत तरी मुंबईकरांना लोकल प्रवासाची मुभा मिळणार नाही असे दिसतेय
.

error: Content is protected !!