ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

बीड मध्ये कोणाचीही दादागिरी चालू देणार नाही – मुख्यमंत्र्यांचा अजितदादा आणि धनंजय मुंडेना इशारा

बीड – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून मोठा इशारा दिला आहे. बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील कोणत्याही आरोपीला सोडणार नाही. बीडमध्ये कुणाचीही दादागिरी खपवून घेतली जाणार नाही. पालकमंत्री पदाबाब ।त आम्ही मिळून ठरवू, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. देवेंद्र फडणवीस किंवा अजित पवार यांनी बीडचे पालकमंत्री स्वीकारायला हवे, अशी मागाणी भाजप आमदार सुरेश धस यांनी केली होती. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली.
बीड जिल्ह्यात कायदा नावाची काही गोष्ट राहिली नाही. जी लोकं स्वत:ला बीड जिल्ह्याचे पालक म्हणून घेत होती ते गँग ऑफ सफेपूर का वासेपूर झाल्याचे. असे म्हणत आहेत. संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड हाच प्रमुख सूत्रधार असल्याचे म्हणत देवेंद्र फडणवीसांनी बीडचे पालकमंत्रिपद घ्यावे, अशी मागणी सुरेश धस यांनी केली होती. त्यांच्या या मागणीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपरोक्त इशारा दिला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी महाराष्ट्रातील वाढत्या गुन्हेगारीवर भाष्य करत चिंता व्यक्त केली आहे. फक्त पोलिसांची बदली करून चालणार नाही. त्यापेक्षा कोण आरोपी आहे हे शोधले पाहिजे. बीड आणि परभणीमध्ये ज्या घटना झाल्या त्यावर विश्वास बसत नाही. जे सिनेमात पाहिले ते वास्तव महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळत आहे. पुढचा महाराष्ट्र कसा असेल अशी भीती वाटत आहे, मला कधीही भीती वाटली नाही, पण आता वाटत आहे, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात राज्य सरकारतर्फे विशेष सरकारी वकील म्हणून बाळासाहेब कोल्हे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शनिवारी बीडच्या पोलीस अधीक्षकपदी नवनीत कांवत यांची नियुक्ती करण्यात आली होती. हे हत्या प्रकरण योग्य प्रकारे हाताळण्यासाठी राज्य सरकारतर्फे विशेष सरकारी वकिलांची नेमणूक करण्यात आली आहे. विशेष सरकारी वकील म्हणून सरकारने बाळासाहेब कोल्हे यांची नियुक्ती केली आहे.

error: Content is protected !!