ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे टाकायला सुरुवात


मुंबई – ज्या कुटुंबांचं वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखांच्या आत आहे, त्या कुटुंबातील महिलांना आर्थिक आधार मिळावा यासाठी महायुती सरकारनं लाडकी बहीण योजना सुरू केली. अंतरिम अर्थसंकल्पामध्ये या योजनेची घोषणा करण्यात आली होती. या योजनेंतर्गत ज्या कुटुंबांचं वार्षिक उत्पन्न हे वर्षाला अडीच लाखांपेक्षा कमी आहे, अशा कुटुंबातील २१ ते ६५ वर्ष वयोगटातील महिलाच्या बँक खात्यात दर महिन्याला दीड हजार रुपये जमा करण्यात येतात.
जुलै पासून या योजनेची अंमलबजावणी करण्यात आली. जुलैपासून ते नोव्हेंबरपर्यंतचे पाच हप्ते आतापर्यंत या योजनेतील लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत. आतापर्यंत या योजनेंतर्गत लाभार्थी महिलांना दर महिन्याला दीड हजार रुपयांप्रमाणे पाच महिन्यांचे साडेसात हजार रुपये मिळाले आहेत. निवडणुकीमुळे ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे पैसे एकत्रच लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले होते. दरम्यान त्यानंतर आता डिसेंबरचे पैसे कधी मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं.
दरम्यान आजपासून लाडकी बहीण योजनेच्या डिसेंबर महिन्याचा हप्ता वितरणाला सुरुवात झाली आहे. पुढीच चार ते पाच दिवसांमध्ये सर्व लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा होण्याची शक्यता आहे. दरम्यान आजपासून डिसेंबरचा हप्ता मिळण्यास सुरुवात झाली आहे, तर दुसरीकडे सरकारनं या योजनेबाबत मोठा निर्णय घेतला आहे. ज्या महिलांना बँक खात्याला आधार कार्ड लिंक नसल्यामुळे पैसे मिळण्यास अडचण आली होती, आता आशा महिलांना देखील पुढील चार ते पाच दिवसांत पैसे मिळणार आहेत. याबाबत मंत्री आदिती तटकरे यांनी माहिती दिली आहे

error: Content is protected !!