मुंबईकरांचे आरोग्य बिघडणार ? विपिन शर्मा यांनी लक्ष देणे गरजेचे – कंत्राटाचे प्रस्ताव आयुक्तांकडे धाडा – आदेश कोणाचे ?
मुंबई/मुंबईसारख्या महानगराची आरोग्य सेवा ही अत्यंत प्रभावी असणे गरजेचे आहे कारण जवळपास साडेतीन कोटींच्या या शहरात महापालिकेची राज्य सरकारची अनेक हॉस्पिटल आहेत आणि त्यात रोज लाखो रुग्ण उपचारासाठी येतात त्यामुळे या रुग्णालयातील डॉक्टर कर्मचारी यांच्याशी रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांची संबंध चांगले असायला हवेत त्याचबरोबर रुग्णालय आणि आसपासच्या परिसराच्या स्वच्छतेला प्राधान्य द्यायला हवे पालिकेचे तात्कालीन अतिरिक्त आयुक्त डॉक्टर सुधाकर शिंदे यांनी त्यांच्या कार्यकाळात आरोग्य विभागाकडे व्यवस्थित लक्ष देत स्वच्छतेवर भर दिला होता त्यामुळे रुग्णालय असो की मुंबई शहरातील मंडळ या रस्ते फूटपात किंवा अन्य ठिकाणी असो पालिकेकडून व्यवस्थित स्वच्छता राखली जायची परंतु आता मात्र परिस्थिती बदललेली आहे एक तर पालिकेत नगरसेवक नाहीत पालिका प्रशासनाचा कारभार हा प्रशासकाकडे आहे अशा स्थितीत शहरातील विविध नागरी सुविधांची जबाबदारी अर्थातच प्रशासनाकडे आहे त्यामुळे प्रशासनाने जातीने लक्ष घालायला हवे परंतु 31 ऑगस्ट 2024 मध्ये विपीन शर्मा यांची नियुक्ती झाल्यानंतर आरोग्य सेवा काहीशी कोलमडल्याची दिसून येत आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या कालावधीत आचारसंहितेमुळे आरोग्य विभागाची काही कामे रखडली होती पण आता निवडणुका झाल्यानंतर ही या कामाला चालना मिळत नसल्याचे दिसत आहे. एच एम आय एस सिस्टीम असो वा आपला दवाखाना असो पण रुग्णालयातील विविध प्रश्न आणि डॉक्टर नर्सेसचे प्रश्न प्रमोशन आणि बढती तसेच बदल्यांचे प्रश्न सोडवण्यात बीपिन शर्मा यांना अपयश आलेले आहे. त्यामुळे मुंबईकरांमध्ये प्रचंड नाराजी आहे जर आरोग्य सेवेतील पदे वेळच्यावेळी भरली गेली नाहीत किंवा आरोग्य सेवेतील कर्मचाऱ्यांकडे लक्ष दिले नाहीत त्यांचे प्रश्न सोडवले नाहीत तर ते त्यांच्या विभागात व्यवस्थित कामे करू शकणार नाहीत परिणामी मुंबईकरांना व्यवस्थित आरोग्य सेवा मिळणार नाही या सगळ्या गोष्टीचा बिपिन वर्मा यांनी विचार करायला हवा होता परंतु ते उदासीन असल्यामुळे मुंबईकरांचे अक्षरशः आरोग्य बिघडण्याच्या मार्गावर आहे
आस्थापन विभागात रिक्त पदे-
: आरोग्य विभाग आस्थापनामध्ये रिक्त पदे अनेक वर्षांपासून भरले गेले नसल्यामुळे त्याचा ताण आरोग्य विभागावर पडत आहे. त्या ठिकाणी कंत्राटी पद्धतीने माणसं देण्याचा प्रयत्न चालू आहे परंतु तो प्रयत्न यशस्वी होताना दिसत नाही. तर कंत्राटदारांची अनेक महिन्यापासून बिले प्रलंबित असल्यामुळे त्यांच्यासमोर कामगारांना पैसे कुठून द्यावे हा यक्षप्रश्न उभा राहिला आहे.
कंत्राटाचे प्रस्ताव आयुक्तांकडे धाडा – असे आदेश कोणाचे ?
आरोग्य विभागातील कंत्राटी कामाचे सर्व प्रस्ताव आयुक्तांकडे भूषण गगराणी यांच्याकडे पाठवावे असा आदेश दिल्याचे समजते. हे प्रस्ताव आयुक्तांकडे पाठवण्याचे प्रयोजन काय याबद्दल कंत्राटदारांमध्ये चर्चा जोरदार चालू आहे. यापूर्वी कंत्राटदारांचे प्रस्ताव अतिरिक्त आयुक्त यांच्या कडे पाठवले जाते असे आणि त्याला मंजुरी त्याच्याकडून दिली जात असे. परंतु हा नियम डावलून आता आयुक्तांकडे प्रस्ताव धाडल्याने त्याला मंजुरी आणि पुढील प्रक्रिया लांबल्याने कंत्राटदार हवालदिल झाले आहेत.