ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

राजकारणात काहीही घडू शकते – ठाकरे भेटीवर फडणवीसांचे सूचक वक्तव्य


नागपूर : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीने महाविकास आघाडीला मोठा धक्का दिला. महायुतीच्या त्सुनामीचा महाविकास आघाडीला जोरदार फटका बसला. या निवडणुकीत उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस आणि महायुतीवर टोकाची टीका केली होती. त्यानंतर आता पुन्हा राजकीय घडामोडींना वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर राजकारणात काहीही होऊ शकतं, असं सूचक वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नागपुरात जाहीर मुलाखत झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत विवेक घळसासी यांनी मुलाखत घेतली. यावेळी उद्धव ठाकरे यांच्या भेटीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘महाराष्ट्रात राजकीय संस्कृती आहे. दक्षिणेत दोन पक्षाचे नेते एकमेकांशी बोलू शकत नाही. ती परिस्थिती महाराष्ट्रात कधीच नव्हती. दुर्दैवाने २०१९ ते २०२४ सालात वाईट परिस्थिती निर्माण झाली. पण मुख्यमंत्री झाल्यावर पहिल्याच भाषणात महाराष्ट्रात राजकीय संस्कृतीत बदल घडवणारं राजकारण करायचं आहे. बदला घेण्याचं राजकारण करायचं नाही. लोकांनी भिंत तोडली, ही चांगली गोष्ट आहे’.असेही ते म्हणाले

error: Content is protected !!