ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

दिल्ली – विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची ४० स्टार प्रचारकांची यादी ! फडणवीस , गडकरींचा समावेश


नागपूर : दिल्ली विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या असून भाजपने ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. भाजपने बुधवारी ४० स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली. त्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा समावेश करण्यात आला आहे. नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपला मोठे यश मिळाले आहे. त्यानंतर फडणवीस आणि गडकरी दिल्ली विधानसभा प्रचाराच्या मैदानात उतरणार असल्याने ही निवड महाराष्ट्राचे दिल्लीत असलेले स्थान अधोरेखीत करणारी आहे.दिल्ली विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजला असून सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार प्रचाराला सुरुवात केली आहे. सत्ताधारी आम आदमी पार्टी आणि काँग्रेसने प्रचारात आघाडी घेतली आहे. दुसरीकडे भाजपने आतापर्यंत ५८ उमेदवारांची घोषणा केली असून अद्याप १२ उमेदवारांची नावे जाहीर होणे बाकी आहे.त्यानंतर बुधवारी दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. ज्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री जेपी नड्डा, गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्री आणि अनेक राज्यांचे मुख्यमंत्री यांचा समावेश आहे.

error: Content is protected !!