ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

सैफ अली प्रकरणात ५० जणांची चौकशी

मुंबई/बॉलीवूडमधील अभिनेता सैफ अली खान याच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी आत्तापर्यंत ५० जणांची चौकशी केली आहे मात्र हल्लेखोर अजूनही मोकाट आहे. हल्लेखोराला पकडण्यासाठी पोलिसांनी अनेक टीम तैनात केलेल्या आहे परंतु अजून पर्यंत तरी पोलिसांना यश आलेले नाही.
१४ जानेवारीच्या पहाटे पावणेतीन वाजता बांद्रातील एका उच्चभ्रू इमारतीत घुसून एका हल्ले खोराने प्रसिद्ध अभिनेते सैफ अली खान यांच्यावर चाकूने हल्ला केला .या हल्ल्यात सैफ यांच्यावर एकूण सहा वार झाले त्यातील मानेवर आणि पाठीत झालेला वार गंभीर होता. वार इतका भयंकर होता की चाकू तुटून चाकूचे पाते सैफ च्या पाठीच्या मणक्यात अडकले. या घटनेमुळे मोठी खळबळ वाजली होती.या घटनेनंतर त्याच भागात रहाणाऱ्या सैफच्या मोठ्या मुलाने तात्काळ सैफल ला रिक्षातून लिलावती रुग्णालयात उपचारासाठी नेले. त्यामुळे तो बचावला. मात्र सैफ वरील वार अत्यंत गंभीर स्वरूपाचे असल्याने त्याला अजूनही आयसीयू मध्ये ठेवण्यात आलेले आहे. दरम्यान या प्रकरणी सैफच्या घरातून तसेच जिन्यावरील मिळालेल्या फुटेज नुसार आरोपी सीसीटीव्ही मध्ये कैद झाला आहे. परंतु अजून तो पोलिसाला सापडलेल्या नाही. त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी दहा ते बारा पथके तयार केली असून आरोपीचा शोध घेतला जात आहे. दरम्यानच्या घरात काम करणारी सैफच्या मुलांची केअरटेकर हिचा यामध्ये हात नाही ना याची खात्री करून घेण्यासाठी पोलिसांनी तिची चार तास कसून चौकशी केली. तसेच आज सकाळपासून सैफशी संबंधित जवळपास ५० लोकांची चौकशी करण्यात आली. पोलीस या प्रकरणात एक एक धागे जुळवत आहेत. परंतु अजून तरी हल्लेखोर पोलिसांच्या हाती लागलेला नाही. प्राथमिक चौकशीनुसार हल्लेखोराने सैफच्या लहान मुलांच्या केअरटेकर कडे एक कोटी रुपये मागितल्याची माहिती समोर आलेली आहे. कारण ज्यावेळी तो घरात घुसला त्यावेळी सर्वात प्रथम ही केअरटेकर त्याच्या समोर आली. मात्र त्याने तिला चाकू दाखवून घाबरवले. तिच्यावर चाकू रोखला. तेव्हा तुमको क्या चाहिये असे तिने विचारले असता मुझे एक कोटी रुपये चाहिये असं तो म्हणाल्याचं तिने पोलिसांना सांगितलं. त्यामुळे पोलीस आता याच अँगलने तपास करीत असल्याचे समजते .सेफ सध्या लिलावती रुग्णालयाच्या अति दक्षता विभागात दाखल असून त्याची प्रकृती स्थिर असल्याचे लीलावतीच्या डॉक्टरांनी सांगितले दरम्यान या घटनेनंतर आता राजकारण सुरू झाले असून ममता बॅनर्जी पासून अरविंद केजरीवाल पर्यंत सर्वांनीच या प्रकरणी गृहमंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर कठोर शब्दात टीका केली आहे.

error: Content is protected !!