ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

उद्धव ठाकरे आणि शरद पवार हे लवकरच मोदींसोबत दिसतील – माजी मंत्र्याचा खळबळ जनक दावा


मुंबई/विरोधी पक्षात शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला कोणतेही भवितव्य नसल्याने शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचे पक्ष पुन्हा भाजपसोबत जाणार अशा चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहेत त्यातच नागपूरमध्ये देवेंद्र फडणवीस यांची उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी भेट घेतल्यामुळे उद्धव ठाकरे पुन्हा भाजपसोबत जाणार अशा चर्चा राहिल्या होत्या तसेच शरद पवार हे सुद्धा भाजपसोबत जाण्याच्या तयारीत आहेत अशाही चर्चा रंगल्या होत्या परंतु या चर्चांना पुष्टी देणारे विधान माजी मंत्री बच्चू कडू यांनी केले आहे बच्चू कडू यांनी म्हटले आहे की शरद पवार आणि उद्धव ठाकरे हे दोघेही लवकरच केंद्रात मोदींसोबत दिसतील बच्चू कडू च्या या दाव्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ माजली आहे
राजकारणात काहीही घडू शकते असे काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते त्यांच्या या विधानाला महाराष्ट्रातील राजकीय विशेषतज्ञ उद्धव ठाकरे आणि भाजपा यांच्यात सलोखा निर्माण होण्याचे हे संकेत आहेत असं म्हणत होते कारण उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर फडणवीस यांनी हे विधान केलेले आहे त्यातच आता बच्चू कडूंच्या विधानामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात काहीतरी मोठे घडामोड घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे कारण काही दिवसांपूर्वीच राहुल शेवाळे यांनी उद्धव ठाकरे गटाचे 15 आमदार आणि चार खासदार आमच्या संपर्कात आहेत असे विधान केले होते त्यामुळे उद्धव ठाकरे आणि शरद पवार हे पुढील काही दिवसात मोठा निर्णय घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे

error: Content is protected !!