राज ठाकरे यांची निवडणूक निकालावर शंका
मुंबई/सत्ताधारी महायुतीने ईव्हीएम च्या मदतीने विधानसभा निवडणूक जिंकली असा आत्तापर्यंत विरोधी पक्षातील नेते आरोप करीत होते परंतु आज मात्र महायुतीच्या जवळ असलेल्या मनसेनेही महायुतीला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना राज ठाकरे यांनी निवडणुकीच्या निकालाबाबत शंका उपस्थित केले आहे हा निकाल कसा लागला याचा खुद्द निवडून आलेल्या सत्ताधारी आमदारांना ही धक्का बसला असल्याचे राज ठाकरे यांचे म्हणणे आहे तसेच आमच्या आमदाराला तर त्याच्या गावातून एकही मत मिळत नाही हे असं कसं होऊ शकतं असा सवाल करतानाच आपल्याला जनतेने मतदान केले आहे आपल्याला मते मिळाली नाहीत असे नाही मते मिळाली फक्त ती आपल्यापर्यंत पोचली नाही असे राज ठाकरेंनी सांगितले
आपल्या भाषणात ते पुढे म्हणाले लोकसभा निवडणुकीनंतर तीन-चार महिन्यातच निकाल कसा फिरतो तसेच आपल्या लोकांनी मतदान केलं आहे पण ते आपल्यापर्यंत पोहोचलेलं नाही काँग्रेसचे बाळासाहेब थोरात सलग ७ वेळा ८० हजाराहून अधिक मतांनी निवडून आले त्यांचा विधानसभेला १० हजार मतांनी पराभव होणे कोणालाही पटणारे नाही यावेळी राज ठाकरे यांनी त्यांच्यावर होणारा आरोप फेटाळून लावला ते म्हणाले राज ठाकरेंची ईडी कडून चौकशी झाल्याने ते घाबरले पण मी घाबरलो नाही तर माझी नेमकी कोणत्या मुद्द्यावर चौकशी झाली तेही त्यांनी सांगून टाकले