ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

मुंबई महापालिकेचं ७४३६६ कोटींचा अर्थसंकल्पवाहतूक विभागासाठी ५१०० कोटींची भरीव तरतूद

मुंबई - महाराष्ट्राची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई महानगरात समस्यांचा डोंगर आहे. पण महापालिके कडे अफाट पैसे असूनही मुंबईकरांच्या या पैशावर पालिका अधिकारी , कंत्राटदार आणि राजकीय पुढारी डल्ला मारीत असल्याने मुंबईकरांच्या नागरी सुविधांचे प्रश्न जिथल्या तिथे आहेत. या पार्शवभूमीवर आज मुंबई महापालिकेचा ७४३६६ कोटींचा बजेट आला यात परिवहन , पार्किंग आणि स्वच्छतेच्या प्रश्नावर अधिक लक्ष देण्यात आले आहे 

देशाची आर्थिक राजधानी अशी मुंबई शहराची ओळख आहे. मुंबई महापालिकेनं नुकताच २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प सादर केला. बीएमसीकडून पुढील आर्थिक वर्षासाठी तब्बल ७४,३६६ कोटी रुपयांचा आर्थिक संकल्प सादर करण्यात आला आहे. या बजेटमधील तब्बल ५१०० कोटींचा निधी हा मुंबईतील वाहतूक विभागासाठी मंजूर करण्यात आला आहे. वाहतूक विभागासाठी बीएमसीकडून जेवढा निधी मंजूर करण्यात आला आहे, तेवढी किंमत सध्या वर्तमानस्थितीमध्ये मुकेश अंबानी यांचा छोटा भाऊ अनिल अंबानी यांच्या घराची आहे. अ.दरम्यान बीएमसीकडून अर्थसंकल्प सादर करण्यात आला, पुढील आर्थिक वर्षासाठी तब्बल ७४३६६ कोटी रुपयांचा आर्थिक संकल्प सादर करण्यात आला आहे. ज्यामध्ये मुंबईच्या वाहातूक विभागासाठी ५१०० कोटी रुपयांच्या बजेटला मंजुरी देण्यात आली आहे.या बजेटमध्ये मुंबईतील वाहतूक समस्या कमी करण्याच्या विविध प्लॅनचा देखील समावेश आहे. याशिवाय या बजेटमध्ये दहिसर चेक नाका येथे बांधण्यात येणाऱ्या ट्रान्सपोर्ट अँड कमर्शियल सेंटरचा देखील समावेश आहे. ज्यामध्ये एक हॉटेल ४५६ बस पार्किंगची जागा आणि १४२४ मोटार वाहन पार्किंगची जागा यांचा समावेश करण्यात आला आहे.पालिकेच्या शाळेतील स्वच्छतागृहांमध्ये तब्बल ५ हजार गंधवेध यंत्रे बसविण्याचा निर्णय पालिकेने घेतला असून अर्थसंकल्पात भरीव तरतूद करण्यात आली आहे.
महापालिका प्रशासनामार्फत भौतिक सुविधा, दर्जेदार शिक्षण व गुणवत्तापूर्ण उपक्रम या सर्वांची सांगड घालून गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचा प्रयत्न केला जातो. महापालिकेच्या विविध माध्यमांच्या ९३८ प्राथमिक आणि १९१ माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण दिले जाते. सध्यस्थितीत पालिकेमार्फत बालवाडीचे ९०० वर्ग, एमपीएसचे ११० वर्ग, सीबीएसई, आयसीएसई, आयबी व आयजीसीएसई मंडळाचे ९३ वर्ग असे एकूण ११०३ पूर्व प्राथमिक वर्ग सुरु आहेत. त्यात एकूण ४१ हजार ५८५ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या सर्व विद्यार्थ्यांसाठी आगामी वर्षात नवनवीन योजना आणि प्रकल्प राबविण्यात येणार आहेत. महानगरपालिकेच्या शहर विभागातील १०० व उपनगरातील ४०० शालेय इमारतींमध्ये स्वच्छतागृहांसाठी प्रत्येक इमारतीत १०० असे एकूण ५ हजार गंधवेध यंत्र बसवण्याचे नियोजन करण्यात आले असून त्यासाठी अर्थसंकल्पात १ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. ही यंत्रे हवेतील दुर्गंधी पसरवणारे घटक, तापमान, आद्रता यांची मोजणी करतात आणि त्याबाबतचा संदेश मोबाईल अॅपच्या माध्यमातून यंत्रणेला पाठवला जातो. त्यामुळे स्वच्छगातृहांमध्ये तातडीने साफसफाई करणे आवश्यक असल्यास ते वेळेत कळू शकते

error: Content is protected !!