ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

जयंत पाटील महायुतीच्या वाटेवर बावनकुळेंची घेतली भेट


मुंबई/शरद पवारांनी राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर ढसाढसा रडणारे की रडण्याचे नाटक करणारे शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेऊन त्यांच्याशी तासभर चर्चा केल्याने पाटील आता महायुतीच्या वाटेवर आहेत की काय अशा चर्चा रंगल्या आहेत
जयंत पाटील हे भाजपा किंवा अजित दादांच्या राष्ट्रवादीत जाणार अशा चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होत्या परंतु प्रत्येक वेळेस त्याचे खंडन केले परंतु नुकतीच त्यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली आणि त्यांच्याशी तासभर चर्चा केली त्यामुळे आता पाटील महायुती सोबत जाणार हे जवळपास नक्की झाले आहे तर पाटील यांनी मात्र ही भेट मतदार संघातील कामांबाबत होती अशी सर्वसाधारण केली आहे परंतु त्यांचे राष्ट्रवादी शरद पवार गटाला रामराम करण्याचे जवळपास नक्की झाले आहे असे बोलले जात आहे.

error: Content is protected !!