ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

माजी मुख्यमंत्र्यांच्या काळातील ३२०० कोटीची कामे फडणवीस यांच्याकडून रद्द


मुंबई/महायुतीतील अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलेला आहे माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळात आरोग्य विभागाच्या 3200 कोटींच्या कामाला नवे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थगिती दिली आहे त्यामुळे शिंदे गटाचे लोक नाराज झाले असल्याचे समजते.
पुन्हा एकदा शिंदे सरकारच्या काळात आरोग्य विभागासाठी घेतलेला निर्णय स्थगित करण्यात आला आहे. माजी आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या काळात दिलेले ३,२०० कोटी रुपयांचे काम रद्द करण्यात आले आहे.

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना तानाजी सावंत यांच्याकडे आरोग्य खात्याची जबाबदारी होती. यावेळी अधिकाऱ्यांच्या बदल्या, रुग्णवाहिका खरेदी यामध्ये अनियमितता झाल्याचा आरोप केला गेला होता. तसेच आरोग्य विभागाच्या अंतर्गत येणारी सर्व शासकीय रुग्णालये आणि प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि उपकेंद्रे यांना बाह्य यंत्रणेद्वारे सापसफाई करण्याचे काम देण्यात आले होते. यासाठी प्रतिवर्षी ६३८ कोटी रुपये याप्रमाणे तीन वर्षांसाठी ३,१९० कोटी रुपयांचे कंत्राट पुण्यातील एका खासगी कंपनीला देण्यात आले होते. मात्र या कंपनीचे कंत्राट आता रद्द करण्यात आले आहे .एकनाथ शिंदे यांच्यासाठी हा मोठा धक्का आहे

error: Content is protected !!