राम मंदिरावरील हल्ल्याचा कट फसला _ आयएसआयच्या एजंटला अटक
फैजाबाद/देशातील कोट्यावधी रामभक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या अयोध्यातील राम मंदिरावर हल्ला करण्याचा कट रचण्यात आला होता त्यासाठी आयएएस उत्तर प्रदेशातीलच एका तरुणाला ट्रेनिंग देऊन पाठवले होते परंतु गुप्तचर संस्थांना याचा सुगावा लागला आणि गुजरात एटीएस व फरीदाबाद स्पेशल टास्क फोर्सने आरोपी अब्दुल रहमान याला अटक केली त्याच्याकडे तोंड हॅन्ड ग्रेनेड सापडले असून सध्या तपास त्याची कसून चौकशी करीत आहेत
फैजाबाद मधील एक तरुण सतत आयएसआयच्या संपर्कात असल्याची माहिती गुजरात एटीएसला मिळाली होती त्यानुसार गुजरात येथे असणे त्याच्यावर नजर ठेवली आणि फरीदाबाद स्पेशल ट्रान्सपोर्ट च्या मदतीने रविवारी त्याला ताब्यात घेतली त्याची चौकशी केली असता त्याने आयएसआय कडून प्रशिक्षण घेतल्याचे कबूल केले तसेच आयएसआयच्या मदतीने तो राम मंदिरावर हल्ला करणार होता परंतु तत्पूर्वीच त्याची माहिती गुजरात एटीएसला मिळाली आणि अब्दुल रहमान पकडला गेला अब्दुल रहमान याचे फैजाबाद मध्ये मटन शॉप आहे आता या संपूर्ण प्रकरणात अब्दुल रहमान ला फैजाबाद फरीदाबाद आणि देशाच्या इतर भागांमधील कोणकोणत्या संघटनांची आणि व्यक्तींची मदत मिळत होती याचा एटीएस तपास करीत आहे परंतु या घटनेमुळे पुन्हा एकदा राम मंदिराची सुरक्षा ऐरणीवर आली आहे अब्दुल रहमान याने राम मंदिरावर हल्ल्याचा कट आखण्यापूर्वी राम मंदिराची अनेक वेळा रेखी केली होती असेही चौकशी उघडकीस आले आहे
