औरंगजेब क्रूर नव्हता अबू आजमीचा जावई शोध महाराष्ट्रात संतापाची लाट
मुंबई/औरंगजेब हा क्रूर नव्हता तर तो एक उत्तम प्रशासक होता त्याने हिंदुस्थानात अनेक मंदिरे बांधली तसेच त्याच्यामुळे अनेक हिंदूंना न्याय मिळाला असे वादग्रस्त विधान करणाऱ्या समाजवादी पक्षाचे आमदार अबू आजमी यांच्याविरुद्ध महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे सर्वच राजकीय पक्षातील नेत्यांनी अबू आजमी च्या या विधानावर तीव्र अक्षय घेत त्याच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे
औरंगजेबाने महाराष्ट्रावर सत्ता काबीज करण्यासाठी इथल्या जनतेवर प्रचंड अन्याय अत्याचार केले छत्रपती संभाजी महाराजांचा अनन्वित छळ केला तसेच हिंदूंची मंदिरे पाडली हिंदू राजांना आपले मांडलिक बनवले आणि हिंदूंवर प्रचंड अत्याचार केले हा एक इतिहास आहे .औरंगजेबाच्या याच अत्याचाराच्या विरोधात छत्रपती शिवाजी महाराज त्यानंतर त्यांचे पुत्र छत्रपती संभाजी महाराज आणि राजाराम महाराज यांनी अखेरपर्यंत औरंगजेब विरुद्ध लढा दिला पण त्याला महाराष्ट्र काबीज करू दिला नाही हा इतिहास जिवंत असताना समाजवादी पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आमदार अबू आझमी याना मात्र औरंगजेब हा भला माणूस वाटतो म्हणूनच त्यांनी औरंगजेबाची स्तुती करताना औरंगजेब हा क्रूर नव्हता तर उत्तम प्रशासक होता त्याने अनेक हिंदू मंदिरे बांधली कित्येक हिंदूंचे प्राण वाचवले अशी मुक्ताफळे उधळली आहेत त्यामुळे महाराष्ट्रात अबू आजमी विरुद्ध संताप उसळलेल्या आहे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी तर औरंगजेब आणि महाराष्ट्रात कुठली कुठली मंदिरे बांधली त्याची अबू आझमीने यादी द्यावी तसेच चुकीची माहिती पसरवल्याबद्दल महाराष्ट्राची जाहीरपणे माफी मागावी अशी मागणी केली आहे तर एकनाथ शिंदे यांनीही देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली आहे त्या वादग्रस्त विधानानंतर संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठला आहे अबू आजमी चे ठीक ठिकाणी पुतळे जाळण्यात आले तसेच त्याच्या प्रतिमेला जोडे मारण्यात आले जोवर अबू आदमीवर कठोर कारवाई होत नाही तोवर आम्ही शांत बसणार नाही असा इशारा हिंदुत्ववादी संघटना तसेच महाराष्ट्रातील सर्वच शिवप्रेमी दिला आहे
