ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

भायखळ्यात उत्तुंग इमारतीला आग मुंबईतील मोठमोठ्या टॉवरच्या फायर ऑडिट चा प्रश्न ऐरणीवर


मुंबई/पालिकेच्या विभागातील अग्निशमन दलाच्या मुख्यालयापासून काही अंतरावरच असलेल्या एका उत्तुंग इमारतीच्या ४२व्या माळ्यावर आग लागली. ही आग विझवताना अग्निशामन दलाच्या अक्षरशः नाकी दम आला याचे कारण अग्निशमन दलाकडे जी शिडी आहे ती फक्त २८ मजल्यांपर्यंतच पोहोचू शकते .आणि आग तर ४२ व्या मजल्यावर लागली होती.त्यातच आगीमुळे इमारतीचा विद्युत पुरवठा बंद करावा लागल्याने या आगीत अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांना ४२ मजले जिन्यावरून चालत जावे लागले. या आगीमुळे मुंबईतील इमारतींच्या फायर ऑडिटचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर वर आलेला आहे. फायर ऑडिट बाबत अग्निशमन दलाचे अधिकारी आणि बिल्डर यांचे साठे लोटे असल्याची चर्चा सध्या सुरू आहे.
मुंबईत सध्या गिरण्यांच्या जागेवर मोठ्या प्रमाणावर टॉवर उभे राहत आहेत. भायखळ्याला गिरण्यांच्या जागेवर उभे राहिलेल्या अशाच सॅटॅलेट 27 टॉवरच्या ४२ व्या मजल्यावर आग लागली होती आगीचा कॉल मिळाल्यानंतर अग्निशामन दलाच्या गाड्या आणि फायर टँकर घटनास्थळी पोहोचले परंतु अग्निशमन दलाकडे जी हायड्रोलिक सीडी आहे ती फक्त २८ माळ्यांपर्यंत पोहोचू शकते त्याच्यापुढे जाऊ शकत नाही त्यामुळे ४२ व्या मजल्यावर अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याची मोठे आव्हान अग्निशामक दलाच्या जवानांवर होते परंतु अग्निशामन दलाच्या जवानांनी ४२मजले चढून जात वरती अडकलेल्यांना बाहेर काढले . कारण आगीमुळे विद्युत पुरवठा बंद करावा लागल्याने लिफ्ट बंद होती तसेच फायर एक्सक्यूशन लिफ्ट ही बंद करण्यात आलेली आहे .अशा परिस्थितीत अग्निशामक दलाच्या जवानांना ४२ व्या माळ्यावर अडकलेल्या लोकांना खाली काढण्यासाठी खूप मोठी कसरत करावी लागली सुदैवाने आगीवर लवकर नियंत्रण मिळवल्यामुळे मनुष्यहानी झाली नाही परंतु मुंबईमध्ये वारंवार लागणाऱ्या आगीच्या घटनेने पुन्हा एकदा फायर ऑडिट चा मुद्दा एरणीवर आला आहे. मुंबईतल्या सर्व इमारतीना फायर ऑडिट कंपल्सरी आहे. फायर ऑडिट आणि त्याबाबतचा संपूर्ण कॉलिटी अहवाल बंधनकारक असतो. परंतु काही बिल्डर अशा प्रकारचा अहवाल देण्यात टाळाटाळ करतात तसेच फायर ऑडिट करताना जर त्याच्यामध्ये काही त्रुटी असतील तर अग्निशामन दलाच्या अधिकाऱ्यांना मॅनेज करून फायर ऑडिटमध्ये कोणत्याही त्रुटी नाही असे अहवालामध्ये नमूद करायला लावतात. परिणामी ज्या त्रुटी राहिलेल्या असतात त्याकडे दुर्लक्ष होते आणि आगीच्या घटना घडतात मुंबई आत्तापर्यंत मोठमोठ्या टावर्स ना ज्या आगी लागलेल्या आहे त्या आधीच्या मागे फायर ऑडिट मधल्या त्रुटी आणि त्याकडे हेतू पुरस्कार करण्यात आलेले दुर्लक्ष हेच मुख्य कारण आहे. असा संशय व्यक्त केला जात आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणात संबंधित बिल्डर आणि अग्निशामक दलाच्या अधिकाऱ्यांकडे सरकारने चौकशी करावी जेणेकरून या आधीचे नेमके कारण काय आहे आणि फायर ऑडिट मध्ये कोणत्या त्रुटी दाखवण्यात आल्या होत्या त्या का दूर करण्यात आल्या नाहीत व त्रुटी असतानाही फायर ऑडिट क्वालिटी अहवाल योग्य असल्याचे का दाखवण्यात आले या मागे कोणाकोणाचा हात आहे याची चौकशी व्हायला हवी अशी मागणी केली जात आहे.

error: Content is protected !!