धनंजय मुंडे यांचा अखेर राजीनामा
मुंबई/संतोष देशमुख हत्या प्रकरणात जे मुद्दे याचे जवळचे सहकारी वाल्मिकी कराड यांचे नाव आल्यानंतर त्यांना आणि त्यांच्या सहकार्याने अटक झाली होती त्यानंतर धनंजय मुंडे यांच्या राजीनामे ची मागणी वाढली होती परंतु धनंजय मुंडे राजीनामा देण्यास तयार नव्हते अखेर संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताच संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली त्यामुळे धनंजय मुंडे च्या दबावासाठी अजित पवार यांच्यावर भाजपा आणि शिंदे गटांचा प्रेशर वाढला त्यामुळे सोमवारी रात्री अजित पवार प्रफुल पटेल आधी राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांची धनंजय मुंडे सोबत बैठक झाली त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही अजित पवारांची चर्चा केली आणि या चर्चेनंतर मुख्यमंत्र्यांनी धनंजय मुंडे यांना राजीनामा देण्याच्या आदेश दिले त्यानुसार धनंजय मुंडे यांनी मंत्री पदाचा राजीनामा दिला आहे दरम्यान धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर त्यांनाही संतोष देशमुख खून प्रकरणात आरोपी कराव अशी मागणी होत असून ठीक ठिकाणी या मागणीसाठी आंदोलने केली जात आहेत
मुख्यमंत्री देशमुख हे सुरुवातीपासूनच धनंजय मुंडे यांच्या राजीनामेसाठी आग्रही होते परंतु प्रत्येक वेळी अजित पवार आणि धनंजय मुंडेंना वाचवले पण संतोष देशमुख यांची कशाप्रकारे हत्या करण्यात आली याबाबतचे अत्यंत भयंकर असे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताच संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठला आणि धनंजय मुंडे ना तात्काळ मंत्रिमंडळातून काढून टाका अशी मागणी करीत लोक रस्त्यावर उतरले इतकेच नव्हे तर अटक करण्यात आलेल्या वाल्मिकी कराड आणि त्याच्या साथीदारांना फार मैदानात फासावर लटकवा अशी ही मागणी आता सुरू झाली आहे दरम्यान लोकांचा हा प्रचंड दबाव लक्षात घेऊन अखेर अजित पवारांना नमते घ्यावे लागले आणि अखेर धनंजय मुंडेंना राजीनामा द्यावा लागला आता राजीनाम्यानंतर धनंजय मुंडे यांच्यावर संतोष देशमुख प्रकरणात ही गुन्हा दाखल होण्याची शक्यता असून संतोष देशमुख हत्याकांड्याचा आरोपी वाल्मिकी कराड याच्यामुळे धनंजय मुंडे यांची संपूर्ण राजकीय कारकीर्द बरबाद होणार आहे
