ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

औरंगजेबाची तारीफ भोवली – अबू आझमी विधानसभा अधिवेशन पर्यंत निलंबित

मुंबई/महाराष्ट्राचा शत्रू असलेल्या औरंगजेबाची तारीख करणे सपाचे प्रदेशाध्यक्ष आमदार अबू आझमी यांना आता चांगलेच भारी पडले संपूर्ण महाराष्ट्र जोडे मारत असताना विधानसभेनेही अबू आजमी याच्या निलंबणाचा ठराव एक मताने मंजूर करण्यात आला त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात आनंद व्यक्त करण्यात येत आहे मात्र आपल्यावर हा अन्याय आहे असे म्हणत थयथयाट करायला सुरुवात केली आहे
औरंगजेब हा उत्तम प्रशासक होता त्याने अनेक मंदिरे बांधली असे म्हणत औरंगजेबाची तारीफ करणारा अबू आजमी याच्या विरोधात संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे त्यानंतर विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात ही त्याचे पडसाद उमटले . याचा अधिवेनात घोषणा विधिमंडळ परिसरात देण्यात आले तसेच याच्या निलंबनाचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. भाजप आमदार चंद्रकांत पाटील यांनी अबू आझमीच्या निलंबनाचा ठराव मांडला त्याला सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील सर्वच आमदारांनी पाठिंबा दिला त्यामुळे अबू आजमी चे विधानसभेने एक मताने निलंबन केले आहे परिणामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधानभवनाच्या आसपास ही भटकू शकणार नाही. समाजवादी पक्षाला हा एक फार मोठा दणका आहे शिवाजी महाराज किंवा शिवशाही बद्दल जो कोणी बोलेल त्याच्या विरोधात महाराष्ट्र कसा पेटून उठतो त्याचे हे जिवंत उदाहरण आहे.

error: Content is protected !!