तुकाराम महाराज शेतकरी बीज महोत्सवाला सोमवारपासून प्रारंभ !
शेतकरी कीर्तन महोत्सवात शाश्वत शेतीवर चिंतन _ प्रसिद्ध कवी अनंत राऊत यांच्यासहमान्यवरांचा सहभाग
परळी वैजनाथ (प्रतिनिधी) : शेतकरी केंद्र बिंदू असलेल्या शेतकरी कीर्तन महोत्सवाच्या तिसऱ्या वर्षी शाश्वत शेती विषयावर दिग्गजांचे मार्गदर्शन मिळणार आहे. अध्यात्मिक चळवळीतू शेतकऱ्यांच्या मानसिक, शारीरिक आणि भौतिक विकासाला आकार देण्याचा प्रयत्न केला जात असून त्याला सर्व स्तरातून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. या वर्षी प्रसिद्ध कवी अनंत राऊत यांच्यासह अनेक मान्यवर या कीर्तन महोत्सवात मार्गदर्शन करणार आहेत.
तुकाराम महाराज बीजेचे औचित्य साधून 25 गावच्या शेतकऱ्यांनी एकत्र येऊन एक अनोखी अध्यात्मिक चळवळ सुरू केली आहे. कीर्तन, भजन या अध्यात्मिक उपक्रमाबरोबरच शेतकऱ्यांच्या मूलभूत प्रश्न या कीर्तन महोत्सवात मार्गदर्शक केले जाते. गेल्या वर्षी शेतकऱ्यांचे आरोग्यावर दिग्गज डाॅक्टरांनी मार्गदर्शन करतानाच आरोग्य तपासणी केली होती. तर.या वर्षी शाश्वत शेतीवर चिंतन करण्यात येणार आहे. त्यासाठी अनेक तज्ञ मार्गदर्शन करणार आहेत.
शेतक-यांना केंद्र स्थानी ठेऊन मागील दोन पासून परळी आणि धारूर तालुक्यातील तब्बल 25 पेक्ष्या अधिक गावातील शेतकरी आणि गावकरी यांनी तुकाराम बीज निमित्ताने सुरू केलेल्या शेतकरी
सोमवार दि 10 मार्च रोजी सकाळी 10.00 वा कान्नापूर येथील बसस्थानक जवळ या शेतकरी कीर्तन महोत्सवाचे औपचारिक उद्घाटन जागतिक कीर्तीचे मृदंगाचार्य हभप. उद्धवबापू आपेगावकर व पंढरपूर येथील संत कैकाडी महाराज यांचे वंशज व मठाधिपती ह.भ.प. भरत महाराज जाधव यांच्या हस्ते कलश, वीणा, मृदंग व टाळ पूजनेने होणार आहे. तर सायंकाळी नामवंत कवी अनंत राऊत, कामगार नेते डॉ.डी. एल कराड यांच्या उपस्थितीत या कीर्तन महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे.
शाश्वत शेती हा या वेळचा मुख्य विषय असून त्याबाबत जिल्हा कृषी अधीक्षक सुभाष साळवे, वनस्पती तज्ञ बशीर शेख, जलतज्ञ विजयअण्णा बोराडे, कृषी तज्ञ बालाजी लोहकरे, पीक पद्धती बदल तज्ञ इरफान शेख यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. सोबतच अध्यात्मिकेतून वैचारिक परिवर्तन करण्यासाठी विवेकी कीर्तनकार ह.भ.प. हरिदास महाराज तम्मेवार (अहमदपूर), ह.भ.प. एकनाथ महाराज माने (नारायण बाबा संस्थान, वांगी), ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज बंडगर (लेखक – होय होय वारकरी), ह.भ.प. डॉ.सुहास महाराज फडतरे (सातारा), ह.भ.प. डॉ. बालाजी महाराज जाधव (संभाजी नगर), ह. भ. प.गणेश महाराज फरताळे (अध्यक्ष शंभू राजे राज्याभिषेक सोहळा बडु बुद्रुक ) तर काल्याचे कीर्तन ह.भ. प.श्यामसुंदर महाराज सोन्नर (अध्यक्ष वारकरी विचार मंच, महाराष्ट्र) यांचे होणार आहे.
जगतगुरू तुकाराम महाराज यांच्या बीजे निमित्ताने आयोजित या कीर्तन महोत्सवात रोज सकाळ, संध्याकाळ एक गावातील घराघरातुन प्रसादरुपी भाकरी जमा करून कीर्तन महोत्सवात पंगत होणार आहे. या शेतकरी कीर्तन महोत्सवाचा लाभ सर्वांनी घ्यावा असे आवाहन मोहा, कांनापूर, म्हतारगाव, आमला, लीमला, कोयाळ, करेवाडी, वंजारवाडी, देवठाणा, मुंगी, गर्देवाडी, वाघाळा, नागपिंपरी, कावळेवाडी, सरफराजपूर, बोधेगाव, वाका, सिरसाळा, भिलेगाव, वडखेल, परचुंडी, मलनाथपूर, मांडेखेल, गोपाळपूर, माळहिवरा, तडोळी आदी गावच्या आयोजक गावकऱ्यांनी केले आहे.
