भाजपाचे माजी खासदार संजय काकडे यांच्या पत्नीचा आत्महत्येचा प्रयत्न
पुणे/भाजपाचे पुण्याचे माजी खासदार आणि विद्यमान उपाध्यक्ष संजय काकडे यांच्या पत्नी उषा काकडे यांनी कौटुंबिक वादातून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला सध्या त्यांच्यावर पुण्याच्या हृदयी रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते.
संजय काकडे हे बांधकाम व्यावसायिक असून सध्या ते भाजपाचे उपाध्यक्ष पुण्यामध्ये त्यांनी विधानसभा निवडणुकीत मोठी जबाबदारी पार पडली होती शिवाय त्यांच्यावर सोपवण्यात आलेली संघटनात्मक जबाबदारी ही त्यांनी पार पाडली ते मुख्यमंत्र्यांचे विश्वास म्हणून ओळखले जातात दुपारी साडेतीनच्या सुमारास कौटुंबिक वादातून त्यांची पत्नी उषा काकडे यादी आत्महत्येचा प्रयत्न केला त्यांना तात्काळ पुण्याच्या रुग्णालयात उपचार अर्थ दाखल करण्यात आले तिथे त्यांच्यावर सध्या उपचार सुरू असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते दरम्यान या आत्महत्या मागचे नेमके कारण काय याचा आता पुणे पोलीस तपास करीत आहेत
