ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

सरकारकडून मिळणारा आनंदाचा शिथा इतिहास जमा! शिंदेंच्या महत्वकांक्षी योजनेला फडणवीसांची कात्री


मुंबई/महायुतीचे सरकार सत्तेवर आल्यानंतर व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री बनल्यानंतर त्यांच्या काळात त्यांनी अनेक महत्त्वकांक्षी योजना सुरू केल्या होत्या ज्यामध्ये लाडके बहीण योजना महिलांना एसटीचा प्रवासात अर्धे भाडे ज्येष्ठांना मोफत प्रवासाची सुविधा यासह सणासुदीच्या काळात आनंदाचा शिरा देण्याच्या योजनेचा समावेश होता परंतु मुख्यमंत्री फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिंदे यांच्या काही योजनांना कात्री लावली आहे यापैकी लाडकी बहीण योजनेमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या त्रुटी शोधून लाभार्थ्यांची संख्या कमी करण्यात आली आहे तर दुसरीकडे सरकारकडून दिला जाणारा आनंदाचा शिरा आता बंद होणार आहे सरकारकडून शिंदेंच्या काळात आनंदाचा शिधा दिला जात असे शंभर रुपयांमध्ये रवा मैदा चणाडाळ आणि पाम तेल साखर असे एक पॅकेज आनंदाच्या शिधा नावाने दिले जात असे परंतु या पॅकेजमुळे सरकारवर आर्थिक बोजा पडत असल्याचे सांगून हा आनंदाचा शिरा आता बंद केला जाणार असल्याचे समजते सरकारने निवडणूक काळात ज्या ज्या घोषणा केल्या होत्या त्या आता हळूहळू बंद पडतात की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे त्यावर अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधकांनी तीव्र टीका केली आहे निवडणुका संपल्यानंतर आता सरकारला लोकांची गरज उरलेली नाही त्यामुळेच अशा प्रकारच्या योजना बंद केल्या जात आहे अशा शब्दात विरोधकांनी सरकारवर असेरे बोलले आहेत मात्र आनंदाचा शिरा सारखी शिंदेंची महत्वकांक्षी योजना गुंडाळण्यात आल्यामुळे स्वतः शिंदेही नाराज आहेत परिणामी महायुती सर्वकाही अल्बेल आहे असे दिसत नाही

error: Content is protected !!