घर बांधण्यासाठी मोफत वाळू देण्याचा सरकारचा निर्णय
मुंबई/ घर बांधण्यासाठी पाच ब्रास मोफत वाळू देण्याचा निर्णय महाराष्ट्रातील महायुती सरकारने घेतला आहे सरकारच्या या निर्णयाचे जनतेकडून स्वागत केले जात आहे या निर्णयामुळे ग्रामीण आणि शहरी भागात घरे बांधणाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे
२०१५ पासून सुरू असलेल्या पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत केंद्राकडून मोठ्या प्रमाणावर गरिबांसाठी घरांची निर्मिती केली जात आहे या योजनेला पूरक असा एक नवा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतलेला आहे सध्या बांधकाम साहित्याची किंमत प्रचंड वाढलेली आहे अशा स्थितीत घरकुलासाठी घर बांधणाऱ्यांना हे साहित्य खरेदी करणे मोठेच अवघड झालेले आहे परिणामी मोठमोठे बिल्डरच वाळू सिनेमा किंवा लोखंड यासारखे बांधकाम साहित्य खरेदी करू शकतात परंतु सामान्य माणसासाठी मात्र घरकुलाला लागणारे साहित्य खरेदी करणे खूप अवघड होते पण या बांधकाम ताई त्यातील वाळू म्हणजेच रेती हा मुख्य घटक आता काही प्रमाणात मोफत मिळणार असल्याने घरकुलासाठी इच्छुक असलेल्यांनी समाधान व्यक्त केले आहे याबाबतचा निर्णय लवकरच कॅबिनेटमध्ये घेतला जाईल असे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले आहे
