जळगाव जिल्ह्यात रोड रोमियोंचा उच्छाद _ केंद्रीय मंत्र्यांच्या मुलीची छेडछाड, दुसऱ्या घटनेत छेडछाडीला कंटाळून विद्यार्थिनीचा आत्महत्येचा प्रयत्न
bbbजळगाव/ जळगाव जिल्ह्यात रोड रोमियोंचा उच्छाद केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंच्या मुलीची छेड झाड दुसऱ्या घटनेत छेडछाडीला कंटाळून विद्यार्थिनीचा आत्महत्येचा प्रयत्न केला पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून चौघांना अटक केली आहे
काही दिवसापूर्वी मुक्ताई नगर यात्रेत केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री व मुक्ताई नगरच्या भाजपा खासदार रक्षा खडसे यांची कन्या व तिच्या मैत्रिणी दर्शनासाठी गेल्या होत्या यावेळी काही रोड रोमियोनी त्यांची छेड काढली होती या प्रकरणी पोलिसांनी ७ टवाळखोर विरुद्ध गुन्हा दाखल केला होता त्यातील चौघांना अटक करण्यात आली असून तिघे फरार आहेत या घटनेनंतर धरण गाव तालुक्यातील एका गावात काही समाजकंटकांनी घरात घुसून दोन बहिणींची छेड काढली तत्पूर्वी एकीच काही तरुण सतत पाठलाग करायचे त्यामुळे त्या मुलीने विष घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला सध्या तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत त्या मुलीची मंत्री गुलाबराव पाटील यांनी भेट घेऊन तिच्या प्रकृतीची विचारपूस केली तसेच आरोपींवर कठोर कारवाईचे आश्वासन दिले
