टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेत भालाफेकपटू नीरज चोप्राने सुवर्ण पदक पटकावत इतिहास रचला
टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेत भालाफेकपटू नीरज चोप्राने सुवर्ण पदक पटकावत इतिहास रचला. नीरजने पहिली फेक ८७.०३ मीटर, दुसरी फेक ८७.५८ मीटर, तिसरी फेक ७६.७९ मीटर लांब केली. पहिल्या तीन फेऱ्यांमध्ये नीरज आघाडीवर होता. चेक रिपब्लिकच्या वडलेजनं ८६.६७ मीटर, तर वेसेली ८५.४४ मीटर लांब भाला फेकला. नीरज चोप्राला सुवर्ण पदक मिळालं. तर वडलेज आणि वेसेलीला अनुक्रमे रजत आणि कांस्य पदक मिळालं. नीरजसह १२ स्पर्धेक अंतिम फेरीत होते. नीरज चोप्रा (भारत), वेबर (जर्मनी), वडलेज (चेक रिपब्लिक), वेटर (जर्मनी) आदि हे स्पर्धक होते.