ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
महाराष्ट्रराजकीय

उल्हासनगर शहराचा ७२ वा वर्धापन दिवस साजरा ,

उल्हासनगर / प्रतिनिधी : उल्हासनगर शहराची स्थापना ८ ऑगस्ट १९४९ साली झाली आहे . तेव्हा पासुन या शहराचा वर्धापन दिवस साजरा करण्यात येतो . आज उल्हासनगर शहर ७२ वर्षाचे झाले असुन मोठ्या धामधुम मध्ये ७२ वा वर्धापन दिवस साजरा करण्यात आला आहे . यावेळी महापौर . उपमहापौर . उपायुक्त . स्थायी समिती सभापती. शिक्षण विभागाच्या सभापती . महापालिका अधिकारी कर्मचारी त्याच प्रमाणे अन्याय विरोधी संघर्ष समितीचे पदाधिकारी . सोहम फाऊंडेशन चे पदाधिकारी एस एस टी महाविद्यालयाचे विद्यार्थी त्याच प्रमाणे मनसेचे पदाधिकारी यानी शहर स्थापनेच्या कोनशिलेला पुष्पहार घालुन वंदन केले.तर ज्येष्ट पत्रकार दिलीप मालवणकर यानी आपले मनोगत व्यक्त करताना उल्हासनगर शहराचा इतिहास सांगितला .

उल्हासनगर शहराचा स्थापना दिन ८ ऑगष्ट रोजी दरवर्षी साजरा होतो . भारतात उल्हासनगर हे शहर एक असे आहे की या शहराचा स्थापना दिवस साजरा करण्यात येतो . या शहराच्या स्थापनेची कोनशिला पहिले गव्हर्नर जनरल सी राजगोपालचारी यानी ८ ऑगष्ट १९४९ साली केली आहे. ही कोनशिला महापालिकेच्या पाठामागे असलेल्या तरण तलावा जवळ लावलेली आहे . याच कोनशिलेला वंदन करुन शहराचा वर्धापन दिवस साजरा करण्यात येतो .
महापौर लिलाबाई आशान . उपमहापौर भगवान भालेराव . महापालिकेचे उपायुक्त अशोक नाईकवडे . स्थायी समिती सभापती टोनि शिरवानी . शिक्षण विभागाच्या सभापती शुभांगी बेहनवाल . आमदार कुमार आयलानी . अन्याय विरोधी संघर्ष समितीचे अध्यक्ष दिलीप मालवणकर . पंकज गुरव . कुमार रेड्डीयार .प्रबळ संघटन चे राम शर्मा . समाजसेविका ज्योती तायडे . मनसेचे प्रदीप गोडसे . सचिन कदम . हिराली फाऊंडेशन च्या अध्यक्षा सरिता खानचंदानी . सोहम फाऊंडेशन च्या अध्यक्षा मनिषा राव. मिरा सपकाळे. राष्ट्रवादीच्या सीमा आहुजा . महेश आहुजा . कॉंग्रेस चे किशोर धडके . शंकर आहुजा . दिपक सोनवणे . अनिल सिन्हा . संविधानाचे अभ्यास अमर जोशी या सर्वानी कोनशिलेचे दर्शन घेवुन वंदन केले आहे. दरम्यान यावेळी एक पेन. एक वही. आणण्याची हाक या कार्यक्रमाचे आयोजक शशिकांत दायमा यानी दिली होती. तेव्हा प्रत्येकाने एक पेन एक वही आणुन आपले कर्तव्य पार पाडले .जमा झालेल्या वह्या आणि पेन गरजु मुलाना वाटप करण्यात येणार आहेत दरम्यान एस एस टी महाविद्यालयाचे शेकडो विद्यार्थी दरवर्षी पाच ते सहा किलोमीटर अंतर चालुन कोनशिले जवळ येतात आणि वंदन करतात .

error: Content is protected !!