बरे लसीकरण हा निकष ठेवताना दोन डोसचीच मर्यादा का? एक डोस घेतलेले लोकल मधून गेले तर त्यांच्यामुळे कोरोंना पसरणार आहे का?
तिकीट बंद केल्याने अनेक प्रवाशांनी नाराजी
बरे लसीकरण हा निकष ठेवताना दोन डोसचीच मर्यादा का? एक डोस घेतलेले लोकल मधून गेले तर त्यांच्यामुळे कोरोंना पसरणार आहे का? बरे दोन डोस क्या मध्ये ८४दिवसांचे म्हणजेच जवळपास तीन महिन्यांचे अंतर आहे. मग एक डोस घेतलेल्यांनी तीन महिने नोकरी धंदा सोडून घरातच बसायचे का? बरे तुमच्या लसीकरण मोहिमेत तरी नियमितता आहे का? कित्येक केंद्रात पास उपलब्ध नसल्याने लोकांना रांगा लावून परत फिरावे लागतेय.त्यामुळे एक डोस घेऊन दुसऱ्या दोसच्या प्रतीक्षेत असलेल्या कित्येक लोकांना ८४दिवस उलटून गेल्या नंतर सुधा लस घेता आलेली नाही मग अशा लोकांना रेल्वे प्रवास नाकारणे कितपत योग्य आहे? आता या अन्याय विरुद्ध लोकांनी आवाज उठवणे गरजेचे आहे कारण लोकल ट्रेन ही मुंबईकरांची जीवनवाहिनी आहे आणि रोज ८७ लाख लोक लोकल ट्रेनने प्रवास करतात. मुंबई आणि उपनगरात फक्त२२ लाख लोकांचे लसीकरण झालेले आहे.त्यामुळे तेवढ्याच लोकांना लोकल ट्रेनच्या प्रवासाची मुभा आहे मग उरलेल्या ६५ लाख लोकांनी काय चालत कामा धंद्याला जायचे.की काम धंदा सोडून घरी बसायचे? याचे उत्तर उद्धव ठाक आणि त्यांची सल्लागार असलेल्या टास्क फोर्स च्या डॉक्टरांनी द्यावे. सरकारला चुकीचे सल्ले देऊन महाराष्ट्राची का वाट लावताय? ज्यांचा काम धंदा गेलाय ते लोक आणि त्यांची पोरेबाळे सरकारला आणि खास करून टास्क फोर्सच्या डॉक्टरांना शिव्या शाप देत आहेत.राहता राहिला सवाल उद्धव ठाकरे यांचा तर मुंबई आणि इतर महापालिकांची निवडणूक तोंडावर आलेलीच आहे या निवडणुकीत सगळ्यात जास्त किंमत उद्धव ठाकरे यांना चुकवावी लागणार आहे कारण मुंबईकर चिडलेला आहे तो गप्प बसणार नाही .कारण लोकांवर अन्याय करायचा तरी किती त्याला काही मर्यादा आहेत की नाही? रेल्वेचे तिकीट सर्वसामान्य जनतेसाठी बंद करून सरकारने आणि खास करून मुख्यमंत्र्यांनी पायावर धोंडा मारून घेतलाय त्याच्या वेदना किती भयंकर असू शकतील याची जाणीव त्यांना पालिकेच्या निवडणुकीत होईल
: पास करण्यासाठी रेल्वेच्या तिकीट खिडकीवर प्रचंड गर्दी
मुंबई/ लसीचे दोन डोस घेतलेल्यांना १५ऑगस्ट पासून रेल्वेचा पास मिळणार आहे आणि त्याची काल पासून सुरुवात झाली मात्र पहिल्याच दिवशी रेल्वेच्या तिकीट खिडकीवर पास काढल्याणी आलेल्या प्रवाशांची तुफान गर्दी लोटली होती एकट्या मध्य रेल्वेच्या हार्बर,ट्रान्स हार्बर आणि मध्य या तिन्ही मार्गावर १५हजारहून अधिक लोकांनी पास कडल्याचे समजते.पदासाठी आवश्यक असलेली कागदपत्रे घेऊन लोक रांगेत उभे होते आणि रेल्वेचे कर्मचारी त्यांना योग्य मार्गदर्शन करीत होती दोन डोस घेतल्याणी ऑफ आणि ऑन लाईन अशा दोन्ही प्रकारांमध्ये पास कड्या येणार आहे तर तिकीट बंद केल्याने अनेक प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे.