ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रराजकीय

महाराष्ट्र सदन घोटाळ्या मधून भुजबळ निर्दोष

सत्य परेशान हो सकता है!पराजित नहीं न्याय देवतेवर पूर्ण विश्वास होता
मुंबई/ संपूर्ण भारतात गाजलेल्या आणि भुजबळांना सव्वा दोन वर्ष तुरुंगवास घडवणाऱ्या ८०० कोटींच्या महाराष्ट्र सदन घोटाळ्या मधून काल सबळ पुरावा अभावी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्यासह ८ जणांची सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली.या निकाला नंतर घेलेल्या पत्रकार परिषदेत सत्य पारेशान हो सकता है मगर पराभूत नाही अशी भाऊक प्रतिक्रिया भुजबळांनी व्यक्त केली .
आघाडी सरकारच्या काळात छगन भुजबळ हे बांधकाम मंत्री असताना त्यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून दिल्लीतील महाराष्ट्र सदनाच्या कामात मोठा आर्थिक घोटाळा केल्याचा त्यांच्यावर आरोप होता चमणकर इन्टर प्रायझेस या कंपनीला कंत्राट मिळवून देताना भुजबळांनी पदाचा गैरवापर केला आणि चमणकर कंपनीसाठी नियम डावलून काही अनुकूल निर्णय घेतले सक्त वसुली संचालनाच्या या आरोपामुळे भुजबळ वादाच्या भोवऱ्यात सापडले होते . महाराष्ट्र सदन घोटाळ्यात भुजबळांच्या कुटुंबियांवर सुधा भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते चमणकर यांच्या कंपनीला कंत्राट देताना निविदा न मागवता कंत्राट दिले तसेच अस्तित्वात नसलेल्या कंपन्या दाखवून आर्थिक गैरव्यवहार केला असा आरोप त्यांच्यावर होता .भुजबळांनी वेगवेगळ्या कंपन्या कडून साडे तेरा कोटींची लाच घेतली असाही आरोप आहे दरम्यान महाराष्ट्रात सतांतर होऊन सेना भाजपचे राज्य येताच तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भुजबळांच्या चौकशीचे आदेश दिले आणि कारवाई सुरू झाली मार्च २०१६ मध्ये भुजबळांची सलग १० तास चौकशी होऊन त्यांना अटक झाली २०१५मध्ये काळा पैसा प्रतिबंधक कायद्या अंतर्गत भुजबळ त्यांचा पुत्र पंकज,पुतण्या समीर तसेच तन्वीर शेख इम्रान शेख यांच्यावर २गुन्हे दाखल करण्यात आले होते .महाराष्ट्र सदन व मनी लॉडरी आदी प्रकरणात अंजली दमानिया यांच्या तक्रारीवरून भुजबळ त्यांचे कुटुंबीय आणि अन्य साथीदार यांच्या विरुद्ध ११गुन्हे दाखल होते आणि अटकेनंतर भुजबळांना तब्बल सव्वा दोन वर्ष तुरुंगात राहावे लागले तर त्यांची २०० कोटींची मालमत्ता सुधा जप्त करण्यात आली . सन २०१६ ते २०१८ या काळात भुजबळ आणि त्यांचा पुतण्या समीर जेल मध्ये होते ४मे २०१८ मध्ये त्यांना जमीन मंजूर झाला . बाहेर आल्यावर त्यांनी या सर्व प्रकरणात सफाई देताना आपण निर्दोष असल्याचे सांगितले तर त्यांच्या विरुद्धच्या खटल्यात त्यांच्या वकिलांनी सत्र न्यायालयात भुजबळांची व्यवस्थित आणि पुराव्यानिशी बाजू मांडली त्यामुळे भ्रष्टाचाराच्या खटल्यातून काल सत्र न्यायालयाने भुजबळ आणि अन्य ८ जणांची निर्दोष मुक्तता केली . निकाल आल्यानंतर त्यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची भेट घेतली तसेच पत्रकार परिषद घेऊन सत्याचा कशा प्रकारे विजय झाला ते सांगितले .

बॉक्स/उच्च न्यायालयात जाणार/अंजली दमानिया
छगन भुजबळ,समीर भुजबळ,पंकज भुजबळ यांना महाराष्ट्र सदन घोटाळ्यात सत्र न्यायालयाने जरी क्लीन चीट दिलेली असली तरी सत्र न्यायालयाच्या या निकालाला आपण उच्च न्यायालयात आव्हान देणार आहोत असे या प्रकरणातील याचिकार्त्या अंजली दमानिया यांनी सांगितले समीर भुजबळ आणि इतरांनी तलोजाच्या एका केस मध्ये दाखल केलेली डिस्चार्ज पीटिशन कोर्टाने मान्य केली कारण सरकारी वकील गैरहजर होते .अशावेळी खटल्यात बाजू कोण मांडणार सरकार जर अशा प्रकारे बाजू मांडणारा नसेल तर एकेक केस अशीच डिस्चार्ज होत जाईल असेही दमानिया म्हणाल्या

error: Content is protected !!