- मुंबई एस.आर.ए.च्या अधिकार्यांचे हे पाप उघडकीस आल्यानंतर हवालदिल झालेल्या झोपडपट्टीवासीयांच्या मदतीला केंद्रीय सामाजिक,न्याय अधिकारिता,राज्यमंत्री रामदास आठवले आले असून मी एकही झोपडीधारकाला बेघर होऊ देणार नाही असे आश्वासन त्यांनी म्हाडा मध्ये झालेल्या बैठकीतील पत्रकार परिषदेत दिले त्यामुळे मुंबईतील लाखो झोपडपट्टीवासीयांना मोठा दिलासा मिळाला आहे व सरकारी अधिकार्यांचा गलथानपणा आणि अक्षम्य असा निष्काळजीपणा यापूर्वहि अनेक वेळा जनतेसाठी त्रासदायक ठरला आहे. आणि आता तर सरकारच्या झोपडपट्टी पुनर्वसन योजनेत पात्र सदस्यांची माहितीच लपवून ठेवण्यात आली याबाबत अंधेरीच्या प्रकाशवाडी कामाबाग गृहनिर्माण संस्थेच्या काही सदस्यांना जेव्हा ते अपात्र असल्याचे समजले तेव्हा या संस्थेच्या पदाधिकार्यांनी याबाबत एस.आर.ए.मध्ये जाऊन चौकशी केली तेव्हा हा सर्व घोटाळा उघडकीस आला आणि त्याची माहितीही मोठी रंजक आहे… झो.पु.योजनेच्या मूळ परिशिष्ट-2 मध्ये अपात्र ठरलेले झोपडीधारक अपीलाअंती पुरवणी परिशिष्ट-2 मध्ये पात्र ठरले मात्र तत्कालीन सचिव श्री.भालचंद्र ठाकरे यांच्या स्वाक्षरीबाबत संदिग्धता दिसून आल्याने पुरवणी परिशिष्ट-2 मध्ये पात्र ठरलेल्याच्या पात्रतेबाबत खात्री करून संबंधित विभागास प्रस्तावित करावे असा आदेश काढण्यात आला त्यामुळे या आदेशाबातची माहिती संबंधित झोपडीधारकांना लेखी किंवा तोंडी अथवा प्रसार माध्यमाद्वारे तरी द्यायला हवी होती पण एका अधिकार्याच्या सही बाबत संशय घेऊन लाखो झोपडपट्टी वासीयांना अपात्र ठरवणे आणि त्याबाबतची माहिती लपवून ठेवण्याचा अक्षम्य गुन्हा एस. आर.ए.च्या अधिकाऱ्यांनी केला आहे. आणि त्याची शिक्षा आता मुंबईतील झो.पु.योजनेच्या लाखो लाभार्थी झोपडीधारकांना भोगावी लागणार आहे कारण अपात्र झोपडीधारकाला त्याचे घर गमवण्याची पाळी येऊ शकते त्यामुळे हा घोटाळा उघडकीस आणणारे प्रकाशवाडी गृहनिर्माण संस्थेचे मुख्यप्रवर्तक: नविन लादे यांनी सदर प्रकरणी एस.आर.ए चे मुख्याधिकारी श्री.सतीश लोखंडे यांची भेट घेऊन त्यांना हा प्रकार सांगितला. त्यावर आम्ही अपात्र झोपडीधारकांना पत्र पाठवून कळवले होते असे त्यांनी उडवाउडवीची उत्तर दिले.पण प्रत्यक्षात कुणालाही लेखी अथवा तोंडी कळलेले नाही ज्यांच्यावर ही जबाबदारी होती त्यामुळे आता नव्याने अपात्र झोपडीधारकांना पत्र पाठवू असे आश्वासन लोखंडे यांनी दिले. पण त्याला काहीच अर्थ नाही कारण मुंबईतील विकासकांनी कोणत्याही गोष्टीची खातरजमा न करता केवळ 0.C.आणि C.C मिळवण्यासाठी बहूतेक ठिकाणी सदनिका वाटप करून ताबापत्र देऊन टाकले. आणि हीच बाब नविन लादे यांनी आठवले साहेबांच्या निदर्शनास आणून देताच त्यांनी म्हाडा मधील बैठकी नंतर च्या पत्रकार परिषद घेऊन कुणालाही बेघर होऊ देणार नाही एस.आर.ए.ची जी काही पुढील प्रक्रिया सुरू असेल ती चालूच राहु दे मात्र याच प्रकरणातील आता ज्या लोकांना जी सदनिका मिळाली आहे त्यांना तिथेच राहु द्या तिथून काढू नका असे आदेश एस.आर.ए.च्या अधिकार्यांना दिले तर पत्रकार परिषदेत नविन लादे आणि त्यांचे वकील अॅड अनिल मिश्रा यांनी या संपूर्ण घोटाळयाची सविस्तर महिती दिली. या बैठक व पत्रकार परिषदेला हेमंत राठोड,भरत पंचाल,मोहन चौधरी,रमेश पराते,बळवंत पटेल,मकरंद आवारे राजकुमार सिंग,मनोज पंचाल व आशिष मिश्रा उपस्थित होते.
नविन लादे(मुख्यप्रवर्तक)प्र.का.स.गृ.संस्था.(नियो.)
📝 अधिक माहितीसाठी श्री.नविन लादे.(तक्रारदार)
📱 ९३७२२९९२९४/९६६४०१७७७७
श्री.सतिश लोखंडे (एस.आर.ए.सीईओ)
📱 ९७६७८९९३३३
श्री.विश्वास गुर्जर (उपजिल्हाधिकारी)
📱 ९७६९३८७९९९
श्रीम.भारती सकपाल (एस.आर.ए.पी.ए.सीईओ)
☎ ०२२२६५९१३१४
error: Content is protected !!