ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
महाराष्ट्र

मुंबई लोकल दहशतवाद्यांच्या निशाण्यावर

मुंबई/मुंबईकरांची लाईफ लाईन म्हणून ओळखली जाणारी मुंबई लोकल दहशतवाद्यांच्या निशाण्यावर होती आणि गॅसचा वापर करून ते मुंबई लोकल ट्रेनला टार्गेट करणार होते अशी धक्कादायक माहिती पकडण्यात आलेल्या सहा दहशतवाद्यांकडून मिळाल्याने मुंबईच्या सर्व रेल्वे स्थानकांवर कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे .दरम्यान काल मुंबईतून आणखी एका दहशतवाद्याला अटक करण्यात आली आहे
मुंबईच्या मध्य,पश्चिम,हार्बर आणि टांस हार्बर या चारही मार्गांवरून रोज ८७ लाख प्रवासी प्रवास करतात पण गेल्या दीड वर्षांपासून करोना काळातील लॉक डाऊन आणि कठोर निर्बंध असल्याने केवळ अत्यावश्याक सेवेतील कर्मचाऱ्यांना च प्रवासाची मुभा होती त्यानंतर काही दिवसांपूर्वी लसीचे दोन डोस घेतलेल्यांना परवानगी देण्यात आलीय त्यामुळे प्रवाशांची संख्या कमी आहे . तरीही रोज ३५ ते ४० लाख प्रवासी प्रवास करीत आहेत म्हणूनच दहशतवाद्यांनी रेल्वे स्थानकांची रेखि करून गॅस सिलेंडर : च्या साहाय्याने मुंबई लोकल मध्ये बॉम्ब स्फोट करण्याची योजना आखली होती पण सर्व दहशतवादी पकडले गेल्याने मोठा धोका टाळला आहे

error: Content is protected !!